PM Modi Mann ki Baat|'एक झाड आईच्या नावाचे...'; PM मोदींचे देशवासियांना आवाहन

'मन की बात' कार्यक्रमातून आईच्या आठवणींना उजाळा
PM Modi Mann ki Baat
'एक झाड आईच्या नावाचे...'; मोदींचे देशवासियांना आवाहनFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'एक झाड आईच्या नावाचे' या मोहिमेअंतर्गत आईच्या नावाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यावेळी पीएम मोदी यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या स्मरणार्थ एक झाड लावल्याचेही म्हटले आहे. 'मन की बात'च्या 111 व्या भागामध्ये ते आज (दि.३० जून) देशवासियांशी संवाद साधत होते.

PM Modi Mann ki Baat
T20 World Cup|T20 विश्वचषक जिंकल्यानंतर PM मोदींचा भारतीय संघाशी फोनवरून संवाद

तिसऱ्या कार्यकाळातील Pm मोदींचा पहिलाच कार्यक्रम

'मन की बात' कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी आज (दि.३० जून) संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आणि तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच 'मन की बात' कार्यक्रम आहे.

PM Modi Mann ki Baat
पीएम मोदी संविधान बदलतील, या निव्वळ अफवा : रामदास आठवले

जीवनात 'आई'चा दर्जा सर्वोच्च- PM मोदी

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जगातील सर्वात मौल्यवान नाते कोणते असे मी तुम्हाला विचारले तर तुम्ही नक्कीच म्हणाल - आई. आपल्या सर्व जीवनात 'आई'चा दर्जा सर्वोच्च आहे. प्रत्येक दुःख सहन करूनही आई आपल्या मुलाचे पालनपोषण करते. प्रत्येक आई आपल्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करते. आपल्या प्रत्येक मुलावरील प्रेम हे आपल्या सर्वांवरील ऋणासारखे आहे, जे कोणीही फेडू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM Modi Mann ki Baat
G7 Summit PM Modi Italy Visit| G7 शिखर परिषदेत PM मोदींच्या जागतिक नेत्यांसोबत बैठका

आपण आईला काहीही देऊ शकत नाही, म्हणून 'या' मोहिमेला सुरूवात

आपण आईला काहीही देऊ शकत नाही, पण आपण दुसरे काही करू शकतो का? हाच विचार करून यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे नाव आहे 'एक पेड माँ के नाम'. माझ्या आईच्या नावाने एक झाडही लावल्याचेही

केरळ आणि मान्सून संबंधाविषयी पंतप्रधान म्हणाले...

कार्यक्रमाला संबोधित करताना पीएम मोदींनी केरळ आणि मान्सून यांच्यातील संबंधाविषयी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, मान्सूनच्या आगमनाबरोबरच आपल्याला छत्र्यांची आठवण होते. परंतु केरळमध्ये विविध प्रकारच्या छत्र्या बनवल्या जातात हे क्वचितच कोणाला माहीत असेल. अशा सुंदर छत्र्या बनवणं ही तिथल्या आदिवासी महिलांची मेहनत असल्याचं ते म्हणाले.

केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचं विशेष महत्त्व

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, मला तुम्हाला केरळमध्ये बनवल्या जाणाऱ्या खास प्रकारच्या छत्र्यांबद्दल सांगायचे आहे. खरं तर केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचं विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि विधींचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या 'कार्थुंबी छत्री' आहेत आणि त्या केरळच्या अट्टप्पाडीमध्ये बनवल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news