G7 Summit PM Modi Italy Visit| G7 शिखर परिषदेत PM मोदींच्या जागतिक नेत्यांसोबत बैठका

G7 Summit PM Modi Italy Visit| G7 शिखर परिषदेत PM मोदींच्या जागतिक नेत्यांसोबत बैठका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: इटलीतील जी-७ (G-7) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह इतर जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका (G7 Summit PM Modi Italy Visit) घेतल्या आहेत.

जी-७ शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज (दि.१४) सकाळी इटलीच्या अपुलिया येथे पोहोचले. दरम्यान कार्यक्रम सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी पीएम मोदी अनेक जागतिक नेत्यांना भेटले. दरम्यान त्यांनी द्विपक्षीय बैठाकाही घेतल्या. भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. (G7 Summit PM Modi Italy Visit)

G7 संघटनेत कोणते देश समाविष्ट आहेत?

G7 शिखर परिषद इटलीच्या अपुलिया भागात होत आहे. G7 संघटनेच्या सदस्य देशांमध्ये भारतासह अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान आणि फ्रान्स तसेच युरोपियन युनियनचा समावेश आहे. (G7 Summit PM Modi Italy Visit)

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत मोदींची भेट

पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी G7 च्या बॅनरखाली द्विपक्षीय बैठक घेतली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यावेळी त्यांनी संरक्षण, आण्विक, अंतराळ, डिजिटल तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली. मोदी-मॅक्रॉन यांनी जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा केली.

याविषयी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, एका वर्षातील ही आमची चौथी बैठक आहे, जी भारत-फ्रेंच संबंधांना आम्ही दिलेले प्राधान्य दर्शवितो. आमच्या चर्चेत संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, एआय, ब्लू इकॉनॉमी आणि बरेच काही यासारख्या अनेक विषयांचा समावेश होता. तरुणांमध्ये नवनिर्मिती आणि संशोधनाला प्रोत्साहन कसे देता येईल यावरही आम्ही चर्चा केली. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी मी त्यांना माझ्या शुभेच्छा दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

PM मोदी-ऋषी सुनक यांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत आपुलिया येथे द्विपक्षीय बैठक घेतली. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी आणि सुनक यांच्यात चर्चा झाल्या. यावेळी सेमीकंडक्टर, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक दृढ करण्याच्या विषयांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले.

पीएम मोदींची झेलेन्स्कींसोबत द्विपक्षीय बैठक

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, पंतप्रधान मोदींनी G7 च्या बॅनरखाली युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. पीएम मोदींनीही त्यांना मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. याआधी गेल्या वर्षीही पंतप्रधान मोदींनी जी7 शिखर परिषदेच्या बॅनरखाली जपानमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली होती. यावेळी मोदी म्हणाले होते की, रशिया-युक्रेन युद्ध चर्चेनेच सोडवले जाऊ शकते, असे आश्वासन दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news