

केरळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२) केरळच्या दौऱ्यावर आहेत. येथे विझिंजम बंदराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासोबत व्यासपीठ शेअर केले. यावेळी पीएम मोदी यांनी असे विधान केले आहे की, 'त्या' विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे.
PM मोदी विझिंजम बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलताना म्हणाले की, 'मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री विजयन येथे बसले आहेत. ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूर देखील बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे." पीएम मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने म्हटले असले तरी, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा सुरू ठेवणे. यासह अनेक मुद्द्यांवर थरूर यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा केली. यानंतर मोदींनी हे भाष्य केले आहे.
तिरुअनंतपुरम मतदारसंघासाठी थरूर यांच्याविरुद्ध अयशस्वी निवडणूक लढवणारे राजीव चंद्रशेखर यांनीही अलीकडेच थरूर यांना "काँग्रेसमधील काही सुज्ञ व्यक्तींपैकी एक" म्हटले आहे. या कार्यक्रमात भाजपचे केरळ राज्य युनिटचे अध्यक्ष चंद्रशेखर, राज्यसभा खासदार जॉन ब्रिटास आणि केरळ कॅबिनेट मंत्र्यांसह इतर वरिष्ठ राजकीय नेत्यांसह उपस्थित होते.