PM Modi: ‘माझी जमीन बळकावली’; न्यायासाठी मुंबईतील जुन्या वर्गमित्राने थेट PM मोदींची भेट घेतली, नेमका काय आहे जमिनीचा वाद?

मीरा रोड येथे राहणाऱ्या ८१ वर्षीय असगरअली वोहरा यांनी जमिनीच्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादात न्यायासाठी त्यांचे शाळेतील जुने वर्गमित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
PM Narendra Modi, Asgarali Vohra
PM Narendra Modi, Asgarali VohraFile Photo
Published on
Updated on

PM Modi old classmate land dispute

मुंबई : मीरा रोड येथे राहणारे ८१ वर्षीय असगरअली वोहरा यांनी अनेक दशकांपासून सुरू असलेल्या जमीनविवादात न्याय मिळावा, तसेच या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आपले जुने शाळकरी वर्गमित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

गुजरातमधील वडनगर येथील बी.एन. स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शिक्षण घेतलेल्या असगरअली वोहरा यांनी ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांची भेट घेऊन या जमीनविवादात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वास वोहरा यांनी व्यक्त केला.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान मोदी आणि वोहरा यांच्या भेटीचे फोटो तसेच प्रसिद्धीपत्रक जारी केले. मोदी आपल्या बालपणीच्या मित्राला नक्कीच न्याय मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

PM Narendra Modi, Asgarali Vohra
Free Treatment for Children | बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

जमिनीचा वाद नेमका काय आहे?

वोहरा यांनी १९८९ मध्ये नोंदणीकृत कराराद्वारे भाईंदर पूर्वेकडील नवघर येथे सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. मात्र, २०११ मध्ये स्वयम् बिल्डर्स आणि सेव्हन-इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स या कंपन्यांनी आपल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप वोहरा यांनी केला आहे. या कंपन्यांचा संबंध भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मूळ मालकाला पूर्णपणे अंधारात ठेवून या मालमत्तेबाबत बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली, असा आरोप वोहरा यांनी केला आहे. तसेच, जमिनीचे दोन भाग करून तिचा ताबा 'स्वयम् बिल्डर्स' आणि 'सेव्हन-इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स'च्या नावावर दाखवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणी २०१५ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. तेव्हापासून महसूल विभाग, महानगरपालिका अधिकारी आणि पोलिसांकडे आपण सातत्याने यावर तोडगा काढण्यासाठी विनंती करत असल्याचे वोहरा यांनी सांगितले.

पंतप्रधानांशी भेटीनंतर प्रशासन सक्रिय

पंतप्रधानांशी झालेल्या भेटीनंतर महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणावर १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली असून, 'सेव्हन-इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स' आणि 'स्वयम् बिल्डर्स'च्या प्रतिनिधींना सुनावणीस उपस्थित राहण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

PM Narendra Modi, Asgarali Vohra
Vijay Mallya PMLA Case: मल्ल्याला दिलासा नाही! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.. ED ने मुंबई हायकोर्टात ठणकावलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news