Vijay Mallya PMLA Case: मल्ल्याला दिलासा नाही! पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.. ED ने मुंबई हायकोर्टात ठणकावलं

Vijay Mallya PMLA Case
Vijay Mallya PMLA Casepudhari
Published on
Updated on

Vijay Mallya PMLA Case: फरार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अडचणी कायम आहेत. त्यांची जप्त केलेली मालमत्ता बँकांना परत केल्याने त्यांच्यावरील मनी लाँड्रिंगचे आरोप संपत नाहीत, असे स्पष्ट प्रतिज्ञापत्र अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे

कर्ज वसुलीसाठी जप्त मालमत्ता वापरण्यास परवानगी देणाऱ्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला मल्ल्या यांनी 2020 मध्ये हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावरच आता सुनावणी सुरू आहे.

Vijay Mallya PMLA Case
Vijay Mallya Bank Recovery: विजय मल्ल्याच्या मालमत्तेतून बँकांना नेमके किती पैसे मिळाले? हायकोर्टाने ED-SBIला मागितला हिशेब

३,५०० कोटी हडप केले?

मल्ल्या यांच्यावर त्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेल्या 9,000 कोटींच्या कर्जापैकी किमान 3,500 कोटी रुपये हडप करून मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप आहे. ED ने 2016 मध्ये त्यांची मालमत्ता जप्त केली होती.

2019 मध्ये विशेष न्यायालयाने SBI च्या नेतृत्वाखालील बँकांना मल्ल्याच्या जप्त मालमत्तेचा, ज्यात UBHL चे शेअर्स होते, वापर करून कर्ज वसूल करण्याची परवानगी दिली होती. यालाच मल्ल्या यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.

Vijay Mallya PMLA Case
Vijay Mallya High Court: भारतात परतण्याचा हेतू आहे की, नाही; आम्ही शेवटची संधी देतोय; विजय मल्ल्या यांना हायकोर्टाचा इशारा

बँकेचे पैसे वसूल झाले आहेत

मल्ल्याचे वकील ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तिवाद केला की, बँकांचे पैसे वसूल झाले आहेत, त्यामुळे हा अर्ज निरर्थक ठरला आहे आणि हा व्यावसायिक वाद मिटवला जावा.

8 सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ED ने म्हटले आहे की, ऑगस्ट 2021 पर्यंत 14,131.6 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता SBI च्या नेतृत्वाखालील गटाला सुपूर्द करण्यात आली आहे.

Vijay Mallya PMLA Case
Vijay Mallya News : विजय मल्ल्या आधी भारतात या, मग दुसऱ्या दिवशी याचिकेवर सुनावणी घेऊ

म्हणून मनी लाँड्रिंगचे आरोप रद्द होत नाहीत

परंतु, केवळ वसुलीमुळे मनी लाँड्रिंगचे आरोप रद्द होत नाहीत. PMLA अंतर्गत मालमत्ता परत करणे ही बँकांचे नुकसान भरून काढण्यासाठीची वैधानिक यंत्रणा आहे..

"दिवाणी देय रकमेच्या वसुलीची कार्यवाही आणि PMLA अंतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा हे दोन वेगळे क्षेत्र आहेत. बँकेची थकबाकी वसूल झाली म्हणजे मनी लाँड्रिंगचा गुन्हा संपला असे होत नाही," असा युक्तिवाद ED ने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news