Free Treatment for Children | बालकांना मिळणार मोफत सर्वसमावेशक उपचार

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून दोन कंपन्यांशी करार
Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.Pudhari News
Published on
Updated on

मुंबई : प्रत्येक बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्याचे जीवन आनंददायी व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांना आता दर्जेदार व सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र’, ‘बजाज फायनान्स’ आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.

जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू यामुळे निरागस बालकांच्या चेहऱ्यावरील हसू मावळून जाते. आपल्या मुलाच्या चेहऱ्यावर एकदा तरी तरी हसू बघावे यासाठी बालकांच्या आई-वडिलांची होणारी तगमग आणि त्यासाठी त्यांचे रुग्णालयाचे उंबरठे झिजवणे डोळ्यात पाणी आणते. शिवाय या विकाराचा उपचार खर्च मोठा असल्याने तो प्रत्येकच पालकाला परवडणारा नाही. याची जाणीव असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टीने विचार करून अशा पालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता राज्यातील एकही बालक दुभंगलेले ओठ व टाळू असलेले राहणार नाही, याची काळजी राज्याचा पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. या कराराद्वारे बालकांना ‘स्माईल ट्रेन इंडिया’च्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येईल.

या रुग्णालयांमध्ये होणार उपचार

आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, अहिल्यानगर

आस्था प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटल, जळगाव

बेंबडे हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

एलिट कॉस्मो क्लिनिक हॉस्पिटल, सोलापूर

लहाने हॉस्पिटल, लातूर

मीरा एनएक्स हॉस्पिटल, मुंबई

एमआरआर चिल्ड्रन्स हॉस्पिटल, ठाणे

पूना हॉस्पिटल, पुणे

शुश्रूषा सिटिझन्स को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल, मुंबई

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल, नागपूर

वेदांत हॉस्पिटल प्रा. लि., नाशिक

वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस (विन्स), कोल्हापूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news