पहिला स्मित हास्य, मग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची अशी झाली भेट

संसद भवन परिसरातील भेटीत या दोन नेत्‍यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून आले.
पहिला स्मित हास्य, मग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे भेटले
पहिला स्मित हास्य, मग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे भेटलेfile photo
Published on
Updated on

pm modi met rahul gandhi prerna sthal parliament premises pay floral tribute mahatma jyotiba phule 200th birth anniversary

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

संसद भवन परिसरात आज (शनिवार) सकाळी राजकारणातील एक अत्यंत खास दृश्य समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अचानक समोरासमोर आले. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी हात जोडून पंतप्रधानांना अभिवादन केले, तर पंतप्रधानांनीही त्याच पद्धतीने प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाल्याचे पहायला मिळाले. केरळ, बंगाल, आसामसह ५ राज्यांमध्ये निवडणुकीची जोरदार चुरस सुरू असताना ही भेट घडल्याने या दृश्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

पहिला स्मित हास्य, मग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे भेटले
PM Narendra Modi | कलम 370 ची भिंत पाडल्याचा भाजपला अभिमान

हात जोडून स्वागत, नंतर सविस्तर चर्चा

ही भेट का झाली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची २००वी जयंती आहे. या निमित्ताने संसद परिसरातील ‘प्रेरणा स्थळ’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांची भेट झाली.

फुले जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून पुष्पांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरातील ‘प्रेरणा स्थळ’ येथे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेचे माजी उपसभापती हरिवंश यांसह अनेक नेते उपस्थित होते.

पहिला स्मित हास्य, मग नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे भेटले
LPG Shortage Nehru Statement: गॅस टंचाईत आता नेहरूंची एन्ट्री... १९५१ च्या 'त्या' वक्तव्याचा उल्लेख करत पंतप्रधान काय म्हणाले?

फुले यांना श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, त्यांचे संपूर्ण जीवन समानता, न्याय आणि शिक्षणासाठी समर्पित होते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिले की, “महान समाजसुधारक महात्मा फुले यांच्या २००व्या जयंती वर्षाचा प्रारंभ होत आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, ज्ञान आणि लोककल्याणासाठी वाहिले. महिला आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी ते अग्रणी होते. त्यांचे विचार समाजाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील.”

मोदी–गांधी यांच्यात काय चर्चा झाली?

संसद परिसरात पंतप्रधान मोदी पोहोचताच राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी त्यांचे हात जोडून स्वागत केले. पंतप्रधानांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर दोघांमध्ये काही काळ चर्चा झाली. सध्या निवडणुकांचा माहोल तापलेला असताना या चर्चेचा नेमका विषय काय होता, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडिओत दोन्ही नेते गंभीर चर्चेत गुंतलेले दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news