LPG Shortage Nehru Statement: गॅस टंचाईत आता नेहरूंची एन्ट्री... १९५१ च्या 'त्या' वक्तव्याचा उल्लेख करत पंतप्रधान काय म्हणाले?

LPG Shortage Nehru Statement
LPG Shortage Nehru Statementpudhari
Published on
Updated on

LPG Shortage Nehru Statement: इराण युद्धाची झळ भारताला देखील बसत असून देशात पेट्रोल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. घरगुती गॅससाठी लोकांनी एजन्सीबाहेर रांगा लावल्या असून विरोधक सरकार एलपीजीचा तुटवडा लपवत आहे तर सत्ताधारी देशात पुरेसा गॅस पुरवठा होत आहे असं सांगत आहे.

दरम्यान, देशात गॅस तुटवड्यावरून वाद सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या ऐतिहासिक भाषणाचा संदर्भ दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंच्या एका वक्तव्याचा उल्लेख करत जागतिक घटनांची भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत चर्चा केली.

LPG Shortage Nehru Statement
Sanjay Raut | "देवासमोर तरी खोटं बोलू नका..." : गॅस टंचाईवरून संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस इमानदार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसाममध्ये किसान सन्मान निधीचे वितरण करत होते. त्यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९५१ मध्ये केलेल्या भाषणाची आठवण करून दिली. यावेळी पंतप्रधान नेहरूंनी देशातील वाढती महागाई आणि वाढत्या किंमतींसाठी कोरियाच्या युद्धाला जबाबदार धरले होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेहरूंनी त्यावेळी सांगितलं होतं की वाढत्या महागाईमागे दोन कराणे आहेत. पहिले युद्ध जे आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. तर दुसरं कारण म्हणजे काळा बाजार यावर आम्ही नियंत्रण मिळवू शकतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'एका बाजूला एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. आम्ही देशाला स्वंयमपूर्ण बनवण्यासाठी काम करतोय. तर काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते कोणत्याही परिस्थितीत देशाबाबत इमानदार नाहीत.

LPG Shortage Nehru Statement
LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

नेहरूंच्या भाषणाचा घेतला संदर्भ

आज युद्धामुळं जे संकट निर्माण झालं आहे त्यात काँग्रेस फक्त अफवा पसरवत आहे. मी काँग्रेसच्या साथीदारांना सांगू इच्छितो की १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून माजी पंतप्रधान नेहरूंनी जे भाषण केलं होतं ते जरा ऐका, ते भाषण ऐकून तुम्हाला धक्काच बसले.

लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात एकदा म्हणाले होते की उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यात युद्ध सुरू आहे त्यामुळं देशात महागाई वाढली आहे. आता उत्तर अन् दक्षिण कोरिया कुठं आहेत आणि ते इथं महागाईतचं बोलत आहेत. आज काँग्रेस देशाची दिशाभूल करण्याचं काम करत आहे. जागतिक संकटाचा काय प्रभाव असतो ते संपूर्ण जग बघत आहे.

LPG Shortage Nehru Statement
Devendra Fadnavis | इंधन टंचाईबाबत काँग्रेसने घबराट निर्माण केली : मुख्यमंत्री फडणवीस

नेहरू काय म्हणाले होते?

१९५१ मध्ये १५ ऑगस्ट रोजी देशाला संबोधित करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चार वर्षांनी देश एकात्मता आणि क्षमता मजबूत करणं खूर गरजेचं आहे.

नेहरू पुढे म्हणाले की, 'स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे. जर सतर्क राहिलो नाही तर या निर्दयी जगात टिकू शकत नाही. लोकांना वाढत्या किंमती काळा बाजार आणि अशा अनेक समस्यांचा सामना करत आहेत. या समस्या दोन कारणांनी उद्भवतात. पहिले कारण जे आपल्या हातात नाही. जसं की कोरियामधील युद्ध दुसऱ्या कारणावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.

दुसऱ्या कारणांमध्ये काळा बाजार येतो. तो सरकार कडक कारवाई करून थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. भूतकाळात या समस्यांचा प्रभावीपणे मुकाबला केला गेला नसेल. मात्र ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. जनतेनं देखील सरकारची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news