

दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगामचा हल्ल्याचा बदला म्हणून बुधवारी (दि.७) मध्यरात्री भारताने पाकिस्तानी दहशतवादविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबविले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्याचे ९ तळ उद्ध्वस्त केले. यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे परदेश दौरे रद्द करण्यात आले आहेत.
'ऑपरेशन सिंदूर' राबण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या युरोपीय देशांचा दौरा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे पंतप्रधान मोदी हे मॉनिटरींग करत होते. यावेळी त्यांच्यासोबत अजित डोवालही उपस्थित होते. ते पीएम मोदी यांना प्रत्येक वेळेची अपडेट देत होते. त्यामुळे हल्ल्यामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ कल्याण मार्ग येथून या मोहिमेवर लक्ष ठेवून होते. NSA अजीत डोवाल हे त्यांना प्रत्येक क्षणाची माहिती देत होते.
दरम्यान पत्रकार परिषदे बोलताना मिस्री पुढे म्हणाले, भारताची कारवाई दहशतवादविरोधीच करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठीच 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. भारताने दहशतवादविरोधात आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. यानंतर पाकिस्तानने आगळीक केल्यास पाकिस्तानचे काही खैर नाही, भारत चोख प्रत्युत्तर देईल, पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला इशारा देखील देण्यात आला आहे
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. हल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.