Operation Sindoor : ईट का जवाब पत्थर से... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

सारा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असून, पाकिस्‍तानला जशाच तसे उत्तर दिले असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी व्यक्‍त केले.
Eknath Shinde on Operation Sindoor
Operation Sindoor : ईट का जवाब पत्थर से... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया File Photo
Published on
Updated on

Deputy Chief Minister Eknath Shinde's reaction on Operation Sindoor

मुंबई : पुढारी ऑनलाईन

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केले. भारताने आज (दि. ७ मे) 'ऑपरेशन सिंदूर'च्या द्वारे अनेक दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. या एअर स्‍ट्राईकवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde on Operation Sindoor
Operation Sindoor : 'दहशतवादाशी झिरो टाेलरन्स..',पाकिस्तानमधील भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर जयशंकर यांची पहिली प्रतिक्रिया

पाकिस्‍तानला जशाच तसे उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्‍तानला करारा जवाब दिला आहे. ईट का जवाब पत्‍थरसे देण्यात आल्‍याचे एकनाथ शिंदे यांनी म्‍हंटले आहे. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये ज्‍या माता, भगिनींचे कुंकू पुसले होते. त्‍यांचा बदला भारताने आज घेतला आहे. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्‍त करून भारताने या माता, भगिनींना आज न्याय दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्‍वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्‍तानला सडेतोड उत्तर मिळाल्‍याचे ते म्‍हणाले.

अशा प्रसंगी संपूर्ण देशवासिय आज पंतप्रधान मोदी यांच्या पाठिशी आहेत. मोदी यांच्या कणखर भूमीकेमुळेच हे करणे शक्‍य झाले. पहलगाम हल्‍ल्‍यातील पीडितांना आज न्याय मिळाल्‍याचे सांगत, त्‍यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.

Eknath Shinde on Operation Sindoor
Operation Sindoor : आज सुरक्षा समितीसह केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

भारताने आज रात्री उशिरा पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारतीय लष्कराने म्हटले आहे की, भारताने ज्या दहशतवादी तळांवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले. एकूण नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असे त्यात म्हटले आहे. त्याचबरोबर, या हल्ल्यांनंतर देशभरातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या कारवाईबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पहिले विधानही समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे नेते राहुल गांधी एक्‍सवर म्‍हटलं आहे की, "आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!"

मोहिमेसाठी 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव का निवडलं?

भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तानमधील दहशतवाद्‍यांना नेस्‍तनाबूत करण्‍यासाठी राबवलेल्‍या मोहिमेला भारतीय सैन्‍यदलाने 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्‍यात आले.

पेहलगाम हल्‍ल्‍यावेळी धर्माबद्दल विचारणा करुन पर्यटकांवर झाडण्‍यात आल्‍या होत्‍या गोळ्या

२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्‍यू झाला होता. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्‍या. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक निर्बंध लादले. या हल्ल्याचा जागतिक पातळीवरही निषेध करण्यात आला.

सीमेवर हवाई दलाच्या सरावाची तयारी सुरू

पहलगाममधील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दल आज पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात युद्ध सराव करणार असताना भारताने ही कारवाई केली आहे. यामध्ये राफेल, मिराज-२०००, तेजस आणि सुखोई-३० सारख्या सर्व आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश असेल. त्याच वेळी, देशातील २५९ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये नागरी सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहेत.

'माझ्‍या पतीच्‍या मृत्यूचा बदला घेतला, मी पंतप्रधान मोदींचे आभार मानते'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्‍यमुखी पडलेल्‍या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्‍यांना शांतता लाभली असेल. आज ते शांततेत असतील."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news