PM Modi Washington shooting | 'लोकशाहीत हिंसेला स्थान नाही' : वॉशिंग्‍टनमधील गोळीबारावर PM मोदींनी व्यक्त केली चिंता

PM Modi Washington shooting |'अशा घटनांचा तीव्र शब्‍दांत निषेध केला पाहिजे
PM Modi
PM Modi file photo
Published on
Updated on

PM Modi Washington shooting

नवी दिल्‍ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टनमध्ये शनिवारी रात्री झालेल्‍या गोळीबार प्रकरणी घडलेल्या सुरक्षा घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस हे सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, हे जाणून दिलासा मिळाला," असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

लोकशाहीत हिंसेला स्थान नाही

पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी शुभेच्छाही दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी स्पष्ट केले की, "कोणत्याही लोकशाहीत हिंसेला स्थान नसते आणि अशा घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला पाहिजे."

PM Modi
Donald Trump : 'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स'’च्या डिनर दरम्यान गोळीबार; हल्‍लेखोराला पकडले

'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स' डिनर दरम्यान गोळीबार

वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्री सुरक्षेची एक मोठी चूक समोर आली. 'व्हाईट हाऊस करस्पॉउंट्स डिनर' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित स्थानी हलवले.

PM Modi
US Iran Conflict | इराणबाबत ट्रम्प काहीतरी 'धोकादायक' विचार करत आहेत? 'व्हाईट हाऊस'च्या पोस्टने वाढवली चिंता

गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा

'व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या (WHCA) कार्यक्रमात गोळीबार करणारा संशयित अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होता. हल्लेखोराच्या निशाण्यावर मीच होतो, असे मला वाटते. अद्याप हल्ल्याच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (दि. २६) माध्यमांशी बोलताना दिली. गोळी लागलेला अधिकारी आता धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

PM Modi
Hormuz Open Iran Reaction: आमच्याकडून हार्मुझची 'किल्ली'च हरवली... शिवराळ डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची इराणनं हवाच काढली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news