US Iran Conflict | इराणबाबत ट्रम्प काहीतरी 'धोकादायक' विचार करत आहेत? 'व्हाईट हाऊस'च्या पोस्टने वाढवली चिंता

US Iran Conflict | 'व्हाईट हाऊस'च्या पोस्टने एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण केले
US Iran Conflict
प्रातिनिधिक छायाचित्र. pudhari
Published on
Updated on

US Iran Conflict

वॉशिंग्‍टन : इराणसोबत वाढता तणाव आणि 'बॅकचॅनल' चर्चेच्या चर्चांदरम्यान व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेकडून जारी करण्यात आलेला हा संदेश केवळ एक 'मोटिव्हेशनल लाईन' नसून इराणबरोबर संघर्ष कयम असतानाच केली गेल्‍याने याला वेगळे महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे.

'व्हाईट हाऊस'च्या पोस्टने एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण केले

सोमवारी व्हाईट हाऊसने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "लॉक्ड-इन मोड: ॲक्टिव्हेटेड, नो एक्सक्यूज, जस्ट विन" अशा तणावपूर्ण काळात व्हाईट हाऊसच्या या पोस्टने एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. इराण चर्चेच्या वाटेवर आपली भूमिका स्पष्ट करत नसेल, तर अमेरिका काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहे का?

US Iran Conflict
Iran Uranium Heist: पायलट रेस्क्यू मिशन हा तर बनाव, त्याच्या आडून अमेरिकेने आखला होता मोठा डाव... इराणचा धक्कादायक दावा

ट्रम्‍प मोठी कारवाई करणार आहेत का?

ट्रम्प सोमवारी तेहरानमध्ये काही मोठी कारवाई करणार आहेत का? इतकेच नाही तर इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी अमेरिकेचा हा शेवटचा इशारा (अल्टिमेटम) आहे का? असे सवालही या पोस्‍टमुळे विचारले जात आहेत.

US Iran Conflict
US-Iran War: अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम: ट्रम्प दोन आठवडे हल्ले थांबवण्यास तयार, इस्रायलचीही संमती

पोस्टचा अर्थ काय? घातक संकेत की अजून काही?

इराणसोबत सुरू असलेला तणाव आणि चर्चेच्या शक्यतांदरम्यान 'लॉक्ड-इन मोड: ॲक्टिव्हेटेड' सारख्या ओळींना साधारण संदेश मानले जाऊ शकत नाही. याकडे एक कडक आणि आक्रमक संकेत म्हणून पाहिले जात आहे. अशी भाषा सहसा तेव्हा वापरली जाते जेव्हा एखादा देश आपली रणनीती निश्चित करतो आणि आता मागे हटण्याऐवजी निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत असतो.

US Iran Conflict
DONALD TRUMP |युद्धात मदतीस नकार अन् ट्रम्प यांचा वार..! थेट फ्रान्सच्या फर्स्ट लेडींचे 'घरगुती' भांडणच आणले चव्हाट्यावर

पोस्‍टचा नेमका अर्थ काय?

लॉक्ड-इन मोड: याचा अर्थ आहे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि सज्ज राहणे.नो एक्सक्यूज, जस्ट विन: याचा अर्थ असा की, लक्ष्य गाठण्यासाठी अमेरिका आता कोणतीही शिथिलता दाखवणार नाही.इराणच्या संदर्भात याचा अर्थ असा लावला जात आहे की, अमेरिका आता कठोर भूमिका घेण्याच्या स्थितीत असून दबाव वाढवण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाकडे वाटचाल करत आहे. अद्याप कोणत्याही अधिकृत लष्करी कारवाईची घोषणा झालेली नसली, तरी असे शब्द सूचित करतात की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि पुढील रणनीती आक्रमक असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news