PM Kisan 24th installment: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! उद्या खात्यात येणार २४ वा हप्ता, तुमचे नाव यादीत आहे का? आजच चेक करा

PM Kisan योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यादीत आपले नाव आहे की नाही आणि आपल्याला हा हप्ता मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने आपले स्टेटस तपासावे लागणार आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaFile Photo
Published on: 
Updated on: 

PM Kisan Yojana 24th installment

नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता उद्या म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमातून या हप्त्याचे वितरण करतील. देशभरातील ९.३४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,६८० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, यादीत आपले नाव आहे की नाही आणि आपल्याला हा हप्ता मिळणार का, हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीने आपले स्टेटस तपासावे लागणार आहे.

असे तपासा तुमचे 'बेनिफिशिअरी स्टेटस'

शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन "Know Your Status" या पर्यायाद्वारे आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. त्यासाठी नोंदणी क्रमांक आणि मोबाईलवर येणारा OTP आवश्यक आहे.

पोर्टलवर स्टेटस तपासताना काही महत्त्वाच्या नोंदी दिसू शकतात, ज्यांचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

'Withheld' (अडकलेले): जर तुमच्या खात्यात मागील हप्ता आला होता, परंतु सध्याच्या स्टेटसमध्ये 'Withheld' असं दिसल्यास, तुमचा हप्ता अडकला आहे असे समजा.

'Under Verification' किंवा 'Eligibility Under Review': या स्थितीमध्येही तुमचा हप्ता प्रलंबित राहू शकतो.

अशा प्रकारची कोणतीही अडचण असल्यास, शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, २४ व्या हप्त्यासोबतच आगामी २५ व्या हप्त्यापासूनही वंचित राहावे लागू शकते.

PM Kisan Yojana
Panchayat Election Voting : मोठी बातमी! ६ महिने गावात राहिलात तरच करता येणार पंचायतीसाठी मतदान

गेल्या काही हप्त्यांमधील आकडेवारी

गेल्या काही टप्प्यांतील आकडेवारी पाहिल्यास लाभार्थ्यांच्या संख्येत सतत बदल होत असल्याचे दिसते. १९ व्या हप्त्याचा लाभ १०,०६,८५,६१५ शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, २० व्या हप्त्यात हा आकडा ९.७१ कोटींवर आला. त्यानंतर २१ व्या हप्त्यात ९.३५ कोटी, २२ व्या हप्त्यात ९.४६ कोटी आणि २३ व्या हप्त्यात ९.४४ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते.

PM-Kisan योजना नेमकी काय?

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दर चार महिन्यांनी थेट बँक खात्यात जमा केली जाते.

आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते पासबुक, जमिनीची कागदपत्रे, मोबाईल नंबर, ई-केवायसी, पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर आणि अद्ययावत वैयक्तिक माहिती आवश्यक असते. नवीन नोंदणी करण्यासाठी शेतकरी अधिकृत पोर्टल, जवळचे सीएससी केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात.

PM Kisan Yojana
Congress big Defeat : निवडणुका बॅलेट पेपरवर होऊनही काँग्रेसचा सुपडासाफ! २८ पैकी किती जिंकल्या? सत्ताधाऱ्यांनी घेतली फिरकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news