Who Is Manish Gupta : ...ही तर 'फुलेरा पंचायत', ‘आप’ने खिल्ली उडवली; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती वादाच्या भोवऱ्यात का अडकले?

दिल्लीचा कारभार मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता चालवत असल्याचा ‘आप’चा आरोप
Who Is Manish Gupta
‘आप’चे खासदार संजय सिंग यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती शासकीय बैठकीला उपस्थित असल्याचा फोटो ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.X
Published on
Updated on

Who Is Manish Gupta

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतलेल्या शासकीय बैठकीत त्यांचे पती मनीष गुप्ता यांच्या उपस्थितीवरून राजधानीत नवा राजकीय वाद उफाळला आहे. विरोधी पक्ष आम आदमी पार्टी (‘आप’ने) या प्रकाराला प्रसिद्ध वेब सिरीज ‘पंचायत’ मधील ‘फुलेरा गाव’च्या कारभाराची उपमा देत भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली आहे. ‘आप’ने यापूर्वीही अनेकवेळा मनीष गुप्ता यांच्या सरकारी कामकाजातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'सरपंच-पती'चे स्‍मरण का केले ?

देशातील अनेक गावांमध्ये महिला सरपंच आहेत. कारण तेथे महिलांसाठी सरपंचपद आरक्षित असते. मात्र वास्तवात सरपंच महिलेचे पतीच गावाची व्यवस्था पाहतात. पत्नीच्या वतीने निर्णय घेतात. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘पंचायत’ या वेब सिरीजमध्ये नेमके याचेच चित्रण आहे. या सिरीजमध्ये मंजू देवी (नीना गुप्ता) सरपंच असली तरी तिचे पतीच सरपंच म्हणून काम पाहतात. ही वेब सिरीज प्रचंड गाजली आहे. त्याचा आधार घेत आम आदमी पार्टीने दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या पती मनीष गुप्ता यांच्या शासकीय बैठकीतील उपस्थितीवर तोंडसुख घेतले आहे.

Who Is Manish Gupta
Aam Aadmi Party | दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का, १५ नगरसेवकांनी दिले राजीनामे

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती मनीष गुप्ता कोण आहेत?

भाजप नेत्या आणि दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे दिल्लीतील व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत. रेखा गुप्ता यांच्या २०२५ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, मनीष गुप्ता यांच्याकडे ‘निकुंज एंटरप्राइजेस’ नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे नाव त्यांच्या मुलाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, मनीष गुप्ता हे एका खासगी विमान कंपनीचे असोसिएट म्हणूनही काम करतात. त्यांचे उत्पन्न ‘व्यवसाय, पगार, शेअर ट्रेडिंग, व्याज आणि कमिशन’ मधून मिळते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी त्यांचे एकूण उत्पन्न रु. ९७ लाख जाहीर करण्यात आले होते. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या जवळ रु. १५.७ लाख रोख रक्कम असून, त्यांनी रोखे, डिबेंचर्स, एनपीएस आणि एलआयसी पॉलिसींमध्ये गुंतवणूक केली आहे.

Who Is Manish Gupta
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासमोर नवे संकट; 2000 कोटींच्या आणखी एका घोटाळ्याप्रकरणी FIR

मनीष गुप्ता यांच्या सरकारी बैठकांमधील उपस्थिती वादाचा विषय

या वर्षी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला. रेखा गुप्ता यांची भाजप नेतृत्वाद्वारे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली, तेव्हा त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला पाठिंबा दिल्याबद्दल पती मनीष गुप्ता यांचे आभार मानले होते. रेखा गुप्ता आणि मनीष गुप्ता यांना मुलगी हर्षिता गुप्ता आणि मुलगा निकुंज गुप्ता अशी दोन अपत्ये आहेत. दिल्ली सरकारमध्ये किंवा भाजपच्या शालीमार बाग मतदारसंघात त्यांचे कोणतेही अधिकृत पद नसले तरी, सरकारी बैठकांमध्ये त्यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Who Is Manish Gupta
AAP Exit From INDIA Alliance | ‘आप’ची इंडिया आघाडीतील फारकत!

‘आप’ने उडवली भाजपची खिल्ली

७ सप्टेंबर रोजी ‘आप’ नेते सौरभ भारद्वाज यांनी रेखा गुप्ता यांच्या इंस्टाग्राम आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) हँडलवरील फोटो शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला. या फोटोंमध्ये त्यांचे पती मनीष गुप्ता शालीमार बागमधील विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत त्यांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. भारद्वाज यांनी याला घटनाबाह्य म्हटले आहे. तसेच हे तर ‘पंचायत’ मालिकेतील नाममात्र सरपंचाच्या भूमिकेसारखे असल्याचे त्यांनी म्हटले. मनीष गुप्ता यांचा सरकारी कामकाजात हस्तक्षेप, बैठका आणि तपासणीमध्ये सहभाग लोकशाहीला कमकुवत करत असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना भारद्वाज म्हणाले की, मनीष गुप्ता हे दिल्लीतील अधिकाऱ्यांना आदेशही देतात.

यापूर्वीही ‘आप’ने केला होता आरोप

एप्रिल महिन्यातही असाच वाद झाला होता, जेव्हा माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी मनीष गुप्ता हे ‘दिल्ली सरकार चालवत आहेत’ असा आरोप केला होता. मनीष गुप्ता हे महापालिका (MCD), दिल्ली जल बोर्ड (DJB), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूवमेंट बोर्ड (DUSIB) च्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत दिसल्याचे सांगत ‘आप’ नेत्या आतिशी यांनी रेखा गुप्ता यांच्या प्रशासकीय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.भाजपने त्यावेळी मनीष गुप्ता यांच्या उपस्थितीचा बचाव करत, ते सरकारी नाही तर पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले होते असे स्पष्ट केले होते. तसेच स्थानिक रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणारे ‘समाजसेवक’ असल्याचे म्हटले होते. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी ‘आप’चा आरोप हा रेखा गुप्ता यांचा अपमान असल्याचे म्हटले होते. त्यांनी रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास हा दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिवपदापासून मुख्यमंत्रीपदी झालेला असल्याचेही स्पष्ट केले होते.यानंतरही ‘आप’ आणि काँग्रेसने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सुरूच ठेवले आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंग यांनी तर दिल्लीत ‘दोन मुख्यमंत्री’ असल्याचा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news