

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पार्टीला ( Aam Aadmi Party) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत पक्षाच्या १५ नगरसेवकांनी राजीनामा दिला असून, नगरसेवकांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
आम आदमी पार्टीच्या बंडखोर नेत्यांनी एमसीडीमध्ये एक वेगळा गट स्थापन केला आहे. या नगर नगरसेवकांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असतील.
आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप बंडखोर नगरसेवकांनी केला आहे. २०२२ मध्ये ते आम आदमी पक्षाच्या तिकिटावर एमसीडीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु एमसीडीमध्ये सत्तेत येऊनही आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व एमसीडी सुरळीत चालवू शकले नाही.आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमन चंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडे, राजेश कुमार, अनिल राणा, देवेंद्र कुमार, हिमानी जैन यांचा समावेश आहे.
आपमधून राजीनामा देण्याबाबत हिमानी जैन म्हणाल्या, "आम्ही इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. आम्ही आपमधून राजीनामा दिला आहे. गेल्या अडीच वर्षात महानगरपालिकेत जे काम व्हायला हवे होते ते झाले नाही. आम्ही सत्तेत होतो, तरीही आम्ही काहीही केले नाही. आमची विचारधारा दिल्लीच्या विकासासाठी काम करणे आहे म्हणून आम्ही एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. दिल्लीच्या विकासासाठी काम करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. आतापर्यंत १५ नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. आणखी काही जण सामील होऊ शकतात."