Crude oil prices | कच्च्या तेलाचा पुन्‍हा भडका! ११५ च्या पार गेलेले दर आणखी किती वाढणार ?

Petrol-Diesel Price | पश्चिम आशियातील संघर्ष चिघळल्‍याने जागतिक पुरवठ्यावर परिणाम
प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्रFile Photo.
Published on
Updated on

Crude oil prices

नवी दिल्‍ली : अमेरिका, इस्‍त्रायल आणि इराण युद्‍धामुळ कच्च्या तेलाचे भाव आता प्रति बॅरल $115 च्या वर गेले आहेत. चिंतेची गोष्ट ही की, हे वाढलेले भाव खाली येण्याचे नावच घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी पश्चिम आशियात युद्ध थांबण्याचे संकेत मिळाले होते. तेव्हा भाव $100 च्या खाली आल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला होता; पण ही आशा फार काळ टिकली नाही आणि आता पुन्हा दरवाढीचा भडका उडाला आहे.

बाजारपेठेचा कल 'दीर्घकालीन धोका'कडे

पश्चिम आशियातील संघर्ष आता पाचव्या आठवड्यातही कायम आहे. तो थांबण्याऐवजी अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. या संघर्षात नवीन देश सामील झाले असून लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. यामुळे बाजारपेठेचा कल आता 'तात्पुरता अडथळा' कडून 'दीर्घकालीन धोका' या विचाराकडे वळला आहे. या सर्व चिंतेच्या केंद्रस्थानी 'होर्मुझची सामुद्रधुनी' आहे. हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे एक पंचमांशपुरवठा या अरुंद मार्गातून होतो. येथे कोणताही अडथळा आल्यास त्याचा जागतिक पुरवठ्यावर तात्काळ परिणाम होतो.

प्रतीकात्मक छायाचित्र
Rahul Gandhi rupee fall : "... हे तर महागाईचे स्‍पष्‍ट संकेत" : रुपयाच्या घसरणीवरून राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

'पुढे काय घडू शकते' याबाबत चिंता

कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला नसला तरी, जहाजांना होणारा उशीर, बदलेले मार्ग आणि वाढलेला विमा खर्च यामुळे तेलाच्या प्रवाहावर आधीच परिणाम झाला आहे. बाजारपेठ केवळ 'काय घडले आहे' यावर नाही, तर 'पुढे काय घडू शकते' यावर प्रतिक्रिया देत आहे. तेलाची बाजारपेठ अत्यंत कमी मार्जिनवर चालते. जागतिक स्तरावर तेलाचा अतिरिक्त पुरवठा मर्यादित आहे. जेव्हा पुरवठ्याचा छोटासा भागही धोक्यात येतो, तेव्हा किमती वेगाने वाढतात. सध्या व्यापारी स्थिरतेची नाही, तर अनिश्चिततेची किंमत मोजत आहेत.

प्रतीकात्मक छायाचित्र
Petrol Diesel Price Hike: ग्राहकांच्या खिशाला झळ; पेट्रोल-डिझेलच्या दरात 5 रुपयांपर्यंत वाढ, देशातील मोठ्या कंपनीने घेतला निर्णय

दरवाढ मागणीमुळे नाही

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ही दरवाढ मागणीमुळे झालेली नाही. जागतिक वापरात अचानक कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. त्याऐवजी, केवळ पुरवठ्याची भीती आणि भू-राजकीय धोक्यांमुळे किमती वाढवल्या जात आहेत. यामुळे व्हा किमती मागणीमुळे वाढतात, तेव्हा त्या काळानुसार स्थिर होतात. मात्र, जेव्हा त्या भीतीमुळे वाढतात, तेव्हा त्यामध्ये मोठी चढ-उतार कायम राहते.

प्रतीकात्मक छायाचित्र
Fuel Tax Cut: पेट्रोल 3 रुपये, डिझेल 10 रुपये.. सरकारने एक्साइज ड्यूटीत केली कपात; महागाईतून दिलासा मिळणार का?

भारतावर एवढा मोठा प्रभाव का?

भारत आपल्या गरजेच्या 85-90% कच्चे तेल आयात करतो. किमती वाढल्यामुळे भारताचे आयात बिल वाढते, रुपयावर दबाव येतो आणि इंधन तसेच वाहतुकीचा खर्च वाढतो.याचा परिणाम शेवटी महागाई वाढण्यात होतो, ज्याचा फटका उद्योग आणि ग्राहक अशा दोघांनाही बसतो.

प्रतीकात्मक छायाचित्र
LPG Crisis Debate|संसदेत LPG संकटावर चर्चा, राहुल गांधींनी व्‍यक्‍त केली 'भीती'; पेट्रोलियन मंत्री पुरींनी दिले प्रत्युत्तर

... तर पुढील वाढ अधिक तीव्र असू शकते

तणाव अधिक वाढला किंवा प्रत्यक्ष पुरवठ्यात अडथळा आला, तर तेल प्रति बॅरल $120 च्या पार जाऊ शकते. टोकाच्या परिस्थितीत ही वाढ अधिक तीव्र असू शकते.तणाव कमी झाला, तर किमती कमी होऊ शकतात. परंतु, तरीही नजीकच्या काळात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे, कारण जोखमीचा प्रीमियम आधीच किमतींमध्ये समाविष्ट झाला आहे.हेच कारण या संकटाला वेगळे ठरवते. ही केवळ तेलाची दरवाढ नाही, तर अपेक्षा असूनही तेलाचे दर कमी होण्यास नकार देत आहेत. ही बदललेली वृत्तीच बाजारपेठेला चिंतेत ठेवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news