Pakistan spy network: देशात मोठा हेरगिरीचा कट उघड; हनीट्रॅप अन् पैशांसाठी गद्दारी, १३ नौदल कर्मचाऱ्यांसह १८ जणांची चौकशी सुरू

पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी कथित हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे.
Indian Army
Indian ArmyFile Photo
Published on: 
Updated on: 

Pakistan spy network

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी कथित हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई हाती घेतली आहे. यामध्ये १३ नौदल कर्मचाऱ्यांसह एकूण १८ संशयित व्यक्ती चौकशीच्या फेरीत आल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या प्रति-गुप्तचर (काउंटर इंटेलिजन्स) विभागाने १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धाड सत्र सुरू करत या देशव्यापी कटाचा पर्दाफाश केला आहे.

आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकसह १० राज्यांमध्ये एकाच वेळी ही कारवाई सुरू असून, त्यासाठी १२ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. 'ऑपरेशन फायरवॉल-२०२६' असे या मोहिमेचे नाव असून, एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचरांशी संपर्क साधणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पूर्व किनाऱ्यावरील अत्यंत संवेदनशील नौदल केंद्र असलेल्या विशाखापट्टनममधील गुप्त माहिती शत्रूराष्ट्राला पुरवल्याचा संशय आहे.

Indian Army
PM Modi Parmelin meeting | भारतात १५ वर्षांत येणार १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक

दोघांना अटक, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. विशाखापट्टनम येथील नौदलात कंत्राटी चालक म्हणून काम करणाऱ्या वरप्रसाद याला संवेदनशील माहिती पाकिस्तानशी संबंधित व्यक्तीला पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोबदल्यात त्याला पैसे मिळाले होते का, याचा तपास सुरू आहे. त्याला १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तसेच कोईम्बतूर येथे प्रशिक्षण घेत असलेल्या ३१ वर्षीय मुखर्जी याला शनिवारी अटक करण्यात आली. हनीट्रॅपमध्ये अडकून त्याने सागरी सुरक्षेची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप आहे. त्यालाही १४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या तो विजयवाडा जिल्हा कारागृहात आहे.

डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी

उरलेल्या १६ संशयितांच्या डिजिटल संवादांची, बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहारांची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून चौकशी केली जात आहे. परदेशी गुप्तचर यंत्रणांशी असणारे त्यांचे संबंध उघड करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे उच्चस्तरीय जाळे पसरवण्यात आले असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Indian Army
Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफीसवर सीबीआयचा छापा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news