मतदानादिवशी राहुल गांधी यांनी घेतले हनुमानाचे दर्शन, बूथची पाहणी

 राहुल गांधी यांनी चुरुवा बजरंगबली मंदिरात दर्शन घेतले
राहुल गांधी यांनी चुरुवा बजरंगबली मंदिरात दर्शन घेतले

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीसाठी आज (दि.२०) पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायबरेलीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी मतदानाच्या दिवशी लखनौहून रायबरेलीत दाखल झाले. रायबरेली – लखनौ सीमेवर असलेल्या चुरुवा बजरंगबली मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांची राहुल गांधींनी भेट घेतली. त्याच्यासोबत सेल्फी काढला. यानंतर त्यांनी बनछरवा येथील एका मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नेते उपस्थित होते. बछरावांनंतर त्यांचा ताफा हरचंदपूरकडे निघाला. येथेही त्यांनी काही बूथची पाहणी केली.

राहुल गांधी यांनी कोणत्या ठिकाणी केली बूथची पाहणी?

  • रायबरेलीचे काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी लखनौहून रायबरेलीत दाखल झाले.
  • चुरुवा बजरंगबली मंदिरात त्यांनी दर्शन घेतले.
  • बनछरवा येथील एका मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली
  • बछरावन येथील महात्मा गांधी इंटर कॉलेज मतदान केंद्राचीही पाहणी केली.
  • बछरावांनंतर त्यांचा ताफा हरचंदपूरकडे निघाला.

यानंतर काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांनी बछरावन येथील महात्मा गांधी इंटर कॉलेज मतदान केंद्राचीही पाहणी केली. बछरावन येथील गांधी इंटर कॉलेज बूथसमोर राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

रायबरेलीची जनता राहुल गांधींना ऐतिहासिक विक्रमी मतांनी विजयी करेल.

काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी सांगितले की, राहुल गांधी आज रायबरेलीतील वेगवेगळ्या बूथला भेट देत आहेत. मतदान केंद्रांवर निवडणूक मतदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, रायबरेली आणि अमेठीच्या जनतेने गांधी कुटुंबाला नेहमीच आपले प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत. यावेळीही रायबरेलीची जनता राहुल गांधींना ऐतिहासिक विक्रमी मतांनी विजयी करणार आहे. भारताचा सर्वात मोठा विजय रायबरेलीचा असेल. ते रायबरेलीच्या लोकांसाठी असेल, राहुल गांधींसाठी असेल.

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 14 जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी, कौशल किशोर, निरंजन ज्योती आणि यूपी सरकारचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यासह 144 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news