Omar Abdullah Marriage: मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकाराशी केलं लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल, कोण आहे त्यांची पत्नी?

Omar Abdullah Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Omar Abdullah Marriage
Omar Abdullah MarriagePudhari
Published on: 
Updated on: 

Omar Abdullah Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी वरिष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याचे सांगितले. त्यांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

उमर अब्दुल्ला यांनी निधी राजदान यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी, 'काल एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली,' असे लिहिले. या पोस्टमध्ये त्यांनी निधी राजदान यांनाही टॅग केले आहे. विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ही आनंदाची बातमी शेअर केली.

उमर अब्दुल्ला यांच्या आयुष्यातील हा नवा अध्याय अशा वेळी सुरू झाला आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या पहिल्या विवाहाचा कायदेशीररीत्या शेवट झाला होता. ३१ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उमर अब्दुल्ला आणि त्यांच्या विभक्त पत्नी पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यास सहमती दर्शवली होती.

सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते घटस्फोटाचे प्रकरण

उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांच्या घटस्फोटाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी उमर अब्दुल्ला यांना घटस्फोट देण्यास नकार दिला होता. या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सुनावणीदरम्यान दोघांनीही आपापसातील मतभेद मिटवून परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४२ अंतर्गत घटस्फोटाला मंजुरी देण्यासाठी दोघांनी संयुक्त अर्जही दाखल केला होता.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितले होते की, दोन्ही बाजूंनी आपले मतभेद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच एकमेकांविरोधात दाखल केलेले खटले मागे घेण्यास आणि प्रलंबित वाद संपवण्यासही दोघांनी सहमती दर्शवली होती.

Omar Abdullah Marriage
Shah Rukh Khan King Movie: चित्रपट रिलीज व्हायचाय, पण शाहरुखच्या ‘किंग’ने आधीच रचला इतिहास! बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

१९९४ मध्ये झाला होता पहिला विवाह

उमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. दिल्लीतील ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर विवाहात झाले. या दाम्पत्याला जाहिर आणि जामिर अशी दोन मुले आहेत.

मात्र, २००९ पासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. २०११ मध्ये उमर अब्दुल्ला यांनी विभक्त राहत असल्याची माहिती दिली होती. अनेक वर्षांपासून दोघे स्वतंत्र राहत असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी नमूद केले होते.

Omar Abdullah Marriage
Gold Silver Price Today: सोनं खरेदी करण्याची संधी? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही कोसळली; पाहा आजचे ताजे दर

कोण आहेत निधी राजदान?

निधी राजदान या पत्रकार आहेत. त्या मूळच्या काश्मिरी पंडित आहेत. त्यांचे वडील कृष्ण राजदान हेही पत्रकार होते. निधी यांनी दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनसंचार संस्थेतून (IIMC) पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी NDTV या वृत्तवाहिनीत काम करण्यास सुरुवात केली. तब्बल २१ वर्षे त्यांनी या वृत्तवाहिनीत पत्रकार म्हणून काम केले. २०२० मध्ये निधी यांनी NDTV मधील नोकरीचा राजीनामा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.