Gold Silver Price Today: सोनं खरेदी करण्याची संधी? सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही कोसळली; पाहा आजचे ताजे दर

Gold Silver Price Today: 31 ऑक्टोबर रोजी देशात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली असून, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरूच आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1,42,400 रुपयांवर आला आहे. तर मुंबईमध्ये हाच दर 1,42,250 रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे.

विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किमती खाली आल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा भाव या आठवड्यात जवळपास 2.9 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर किती?

मनीकंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार 31 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,42,400 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,540 रुपये आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष बाजारातील बदलांकडे लागले आहे.

मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,42,250 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,30,390 रुपये आहे.

शहरानुसार सोन्याच्या किमतींमध्ये थोडाफार फरक दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून त्या दिवसाचा दर तपासणे महत्त्वाचे आहे.

चांदीच्या दरातही मोठी घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी चांदीचा भाव प्रति किलो 2,09,900 रुपयांवर आला आहे.

Gold Silver Price Today
Diwali Muhurat Trading: शेअर बाजार 11 टक्के कोसळला, दिवाळीत गुंतवणूकदारांचं नशीब पालटणार? गेल्या 8 वर्षांचा रेकॉर्ड पाहून थक्क व्हाल

एक दिवस आधी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीच्या किमतीत तब्बल 8,300 रुपयांची घसरण झाली होती. यामुळे चांदीचा भाव जवळपास 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षी जानेवारी महिन्यात चांदीच्या किमतीने प्रति किलो 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर आता चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव प्रति औंस 49 डॉलरवर आला आहे.

Gold Silver Price Today
Noel Tata: टाटा समूहात मोठी घडामोड! नोएल टाटा ६ कंपन्यांमधून बाहेर पडणार; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

सोन्या-चांदीचे दर आणखी घसरणार?

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. जागतिक बाजारातील बदलांचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळू शकतात. मात्र, दर आणखी कमी होतील की पुन्हा वाढतील, हे जागतिक बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.