Viral dance video: 'मुकाबला' गाण्यावर शिक्षिकेचा भन्नाट डान्स; व्हिडीओ पाहणारे म्हणाले, 'प्रभुदेवालाही टक्कर...'

एका शिक्षिकेने 'मुकाबला' या गाजलेल्या गाण्यावर सादर केलेल्या दमदार नृत्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
Viral dance video
Viral dance videofile photo
Published on
Updated on

Viral dance video

ओडिशा: ओडिशातील शिक्षिका मोती बेहरा यांनी 'मुकाबला' या गाजलेल्या गाण्यावर सादर केलेल्या दमदार नृत्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर १९ लाख पेक्षा अधिक वेळा पाहिला गेला असून, नेटिझन्स त्यांचा उत्साह, अचूक स्टेप्स आणि आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक करत आहेत.

प्रभुदेवाच्या अजरामर नृत्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेल्या 'मुकाबला' या गाण्यावर प्रभावी सादरीकरण करणे सोपे नाही. मात्र, ओडिशाच्या मोती बेहरा यांनी आपल्या अफलातून नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मोती बेहरा साध्या कुर्ती आणि जीन्समध्ये दिसतात. कोणताही झगमगाट किंवा विशेष पोशाख न वापरता केवळ आत्मविश्वास, लय आणि नृत्यकौशल्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे.

Viral dance video
Goa beach viral video: मैत्रिणीसोबत गोव्याला आला, दारूच्या नशेत खडकावर बसला; लाट आली अन् वाहून गेला, बागा बीचवरील VIDEO

गाण्याचे सूर सुरू होताच त्यांनी वेगवान आणि अचूक स्टेप्स सादर केल्या. गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर त्यांनी सहजतेने ताल धरला असून, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, पायांची चपळ हालचाल आणि सुरेख ट्रान्झिशन्स यामुळे अनेकांनी त्यांची तुलना थेट प्रभुदेवाशी केली आहे. काहींनी तर "प्रभुदेवालाही कडवी टक्कर देणारा डान्स" अशी प्रतिक्रिया दिली. मोती बेहरा यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलनुसार त्या व्यावसायिक नृत्यांगना नसून शिक्षिका आहेत. कुटुंब व नोकरीची जबाबदारी सांभाळतानाही त्या आपल्या नृत्याची आवड जोपासत असून, नियमितपणे सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात.

यापूर्वीही त्यांनी एका मातांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्या कार्यक्रमातील त्यांच्या सादरीकरणालाही प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळाली होती. मोती बेहरा यांनी ज्या 'मुकाबला' गाण्यावर नृत्य केले आहे, त्या गाण्यालाही समृद्ध इतिहास आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'काधलन'साठी संगीतकार ए. आर. रहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले होते. मनो आणि स्वर्णलता यांच्या आवाजातील हे गाणे हिंदीसह अनेक भाषांमध्ये डब झाल्यानंतर देशभर प्रचंड लोकप्रिय झाले. प्रभुदेवाच्या अप्रतिम नृत्यदिग्दर्शनामुळे हे गाणे आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय डान्स नंबरपैकी एक मानले जाते.

सोशल मीडियावर मोती बेहरा यांच्या या व्हायरल व्हिडीओवर हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी त्यांच्या नृत्याला "विद्युत वेगाचा", "अप्रतिम" आणि "ऊर्जेने भरलेला" असे संबोधले आहे. तर शिक्षिका आणि आईची जबाबदारी सांभाळत आपल्या आवडीला न्याय देणाऱ्या मोती बेहरा यांचे अनेकांनी विशेष कौतुक करत, "खरी प्रतिभा कोणत्याही वयात आणि कोणत्याही परिस्थितीत चमकू शकते," अशी भावना व्यक्त केली आहे.

Viral dance video
Viral Video: धर्मांतर आणि बलात्काराच्या कथित प्रकरणात हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनवणी करणारा VIDEO समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news