Goa beach viral video: मैत्रिणीसोबत गोव्याला आला, दारूच्या नशेत खडकावर बसला; लाट आली अन् वाहून गेला, बागा बीचवरील VIDEO

गोव्यातील बागा बीचवर समुद्रातील खडकावर बसून मौजमजा करताना पाय घसरून एका पर्यटकाचा मृत्यू झाला.
Goa beach viral video
Goa beach viral videoFile Photo
Published on
Updated on

Goa baga beach accident viral video

पणजी: गोव्यातील बागा बीचवर समुद्रातील खडकावर बसून मौजमजा करताना पाय घसरून एका पर्यटकाचा मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली. अश्फाक मसाली (वय ३४) असे मृत पर्यटकाचे नाव असून तो कर्नाटकच्या विजापूर येथील रहिवासी होता. तो सांगलीतील आपल्या एका मैत्रिणीसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आला होता.

अश्फाक आणि त्याची मैत्रीण दिवसभर बागा बीचवर फिरत होते. तिथे अश्फाकने मद्यप्राशन केले होते. त्यानंतर एका धोकादायक ठिकाणी खडकावर बसून तो स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. समुद्र प्रचंड खवळलेला असताना आणि लाटा खडकावर आदळत असताना, त्याची मैत्रीण मोबाईलवर त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होती.

Goa beach viral video
Shocking Video : अजगराच्या उशीवर पहुडली चिमुकली..घरचे व्हिडीओ बनवण्यात मश्गुल.. VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

"मी वर खडकावर उभी होते आणि तो खाली लाटांच्या अगदी जवळ बसला होता. मी त्याला तिथे जाऊ नकोस म्हणून वारंवार सांगत होते, कारण त्याने दारू पिलेली होती," असे त्याच्या मैत्रिणीने सांगितले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अश्फाक वाहून जाण्यापूर्वी काही सेकंद आधी समुद्राच्या पाण्याशी खेळताना दिसत आहे, तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि त्याला आपल्यासोबत ओढून घेऊन गेली.

मित्रांनी सांगूनही ऐकले नाही

लाटेसोबत वाहून गेल्यानंतर अश्फाकने काही मिनिटे समुद्राच्या पाण्यात तरंगत राहण्याचा आणि स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मान्सूनच्या सुरुवातीमुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटांपुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याची मैत्रीण आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनी आरडाओरडा केल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. काही वेळानंतर बागा बीचच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे मित्र त्याला खडकावर जाऊ नकोस म्हणून ओरडून सांगत होते, पण त्याने कोणाचेही ऐकले नाही.

समुद्रात उतरण्यास प्रशासनाची बंदी

समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेसाठी सरकारने नियुक्त केलेल्या 'दृष्टी मरीन' या संस्थेने स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांसाठी एक सूचना जारी केली होती. यात पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर आणि पाण्याच्या इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आणि समुद्रात न उतरण्याचे आवाहन करण्यात आले होते.

राज्यात सध्या समुद्र खवळलेला असून हवामानही अनिश्चित आहे; त्यामुळे पावसाळ्याच्या काळात समुद्रात पोहणे, किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्ट्स आणि मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण किनारपट्टीवर लाल झेंडे लावून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Goa beach viral video
Instagram Fraud Case | मैत्रीला काळिमा! इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून 14 वर्षीय मैत्रिणीला 15 लाखांना लुटले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news