High Court: रात्री घरात घुसणे, महिलेचे कपडे वर करणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नव्हे: उच्च न्यायालय

एखाद्या महिलेच्या घरात रात्री घुसून तिचे कपडे वर करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा असू शकतो, मात्र, त्याचा अर्थ 'बलात्काराचा प्रयत्न' असा होत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे.
Jharkhand High Court
Jharkhand High Courtfile photo
Published on
Updated on

Jharkhand High Court

रांची: एखाद्या महिलेच्या घरात रात्री घुसून तिचे कपडे वर करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा असू शकतो, मात्र, त्याचा अर्थ 'बलात्काराचा प्रयत्न' असा होत नाही, असा महत्त्वाचा निकाल झारखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. महिलेच्या विनयभंगाचा प्रयत्न आणि बलात्काराचा प्रयत्न या दोन वेगवेगळ्या कायदेशीर बाबींमधील फरक स्पष्ट करत झारखंड उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांनी ३१ ऑगस्ट रोजी एका फौजदारी अपिलावर निर्णय देताना असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीने केलेले कृत्य हे कायद्याच्या चौकटीत बलात्काराच्या प्रयत्नांच्या व्याख्येत बसत नाही. महिलेची अब्रू लुटण्याच्या उद्देशाने तिच्यावर फौजदारी बळाचा वापर केल्याबद्दलची त्याची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली, कारण या कमी गंभीर गुन्ह्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध होता. या खटल्याचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.

Jharkhand High Court
High Court on Gift Deed : 'प्रेम आणि आपुलकी' यावर आधारित बक्षीसपत्र पालकांना सांभाळण्याची अट होत नाही; हायकोर्ट

याप्रकरणी पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने २५ जुलै रोजी आरोपीला बलात्काराच्या प्रयत्नासाठी ४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या या आदेशात सुधारणा केली. आरोपीने आधीच आठ महिन्यांचा तुरुंगवास भोगला असल्याने न्यायाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ही शिक्षा पुरेशी आहे, असे सांगत न्यायालयाने त्याची शिक्षा आठ महिन्यांपर्यंत कमी केली आणि त्याची अपील याचिका अंशतः मंजूर केली.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण २६ डिसेंबर १९९९ च्या रात्री घडले होते. २७ डिसेंबर रोजी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयाने त्याला या गुन्ह्यात दोषी ठरवून चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती, ज्याविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले की, "एखादे कृत्य हे बलात्काराच्या अगदी जवळचे किंवा त्याच्या अंतिम टप्प्यातील असेल, तरच त्याला 'बलात्काराचा प्रयत्न' मानले जाऊ शकते. या प्रकरणात उपलब्ध पुराव्यांवरून आरोपीचे कृत्य हे विनयभंगाच्या गुन्ह्यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येते, ते बलात्काराच्या प्रयत्नापर्यंत पोहोचत नाही."

Jharkhand High Court
High Court: 'तमिळनाडूचे अर्थमंत्री इंग्लंडचे राजे आहेत का?'; हायकोर्टाने टीव्हीके नेत्याला फटकारले, काय आहे नेमकं प्रकरण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news