Nidhi Tiwari Death: आलिशान घर, विवाहित इंजिनिअर अन् शेवटचा फोन कॉल... इन्फ्लुएंसर निधीच्या मृत्यू भोवती रहस्याचे ढग दाटले

निधीला शेवटचा कॉल कुणी केला होता... टोकाचं पाऊल उलचण्यास कोण कारणीभूत...? पोलिसांचा तपास सुरू
Nidhi Tiwari
Nidhi Tiwari pudhari
Published on: 
Updated on: 

Nidhi Tiwari Death mystery: मध्य प्रदेशातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधी तिवारी (वय ३०) ही सिंगराऊली येथील राहत्या घरात मृत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून तिच्या निधीच्या कुटुंबीयांनी तिचे शेवटचे बोलणे हे दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या एका तरूणाशी झाले होते असे सांगितलं. निधीच्या आईने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नवे दावे केल्याने या प्रकरणाला रहस्यमय वळण लागलं आहे.

Nidhi Tiwari
Dinosaur Death Mystery | ६६ लाख वर्षांनी उलगडले मोठ्या ‘डायनासोर’च्या मृत्यूचे रहस्य!

भागात तणावाचे वातावरण

ज्यावेळी निधी घरात गळफास लागलेल्या अवस्थेत आढळून आली होती त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी तिला रूग्णालयात नेलं होतं. तिथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कुटुंबीयांच्या मते ही घटना शनिवारी सायंकाळी ८ वाजता घडली. निधीच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

निधीचे फेसबुकवर ९.२८ लाख फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर देखील तिचे ७.१२ लाख फॉलोअर्स आहेत. ती तिच्या मध्य प्रदेशमधील घरात तिच्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

Nidhi Tiwari
Raipur Mystery Death Case | रायपूरमध्ये एकाच कुटुंबातील पाचजण आढळले मृतावस्थेत

आईचा मोठा दावा

निधीच्या निधनानंतर हेमलता तिवारी यांनी पोलिसांना सांगितलं की तिची मुलगी ही मोरवा येथील जीएस ग्रँड रूग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. आईच्या मते निधीची एनसीएल आऊटसोर्सिंग कंपनीत काम करणाऱ्या एका इंजिनिअरसोबत ओळख वाढली. ते सतत एका हॉटेलमध्ये थांबत होते.

हेमलता यांच्या दाव्यानुसार निधी आणि हा इंजिनिअर यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मात्र कुटुंबीयांना नंतर तो इंजिनिअर हा विवाहित असून त्याला दोन मुलं असल्याचं देखील समजलं. त्यानंतर आम्ही निधीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितलं. मात्र आईच्या दाव्यानुसार त्या दोघांनी तरी देखील एकमेकांना संपर्क करणं सुरू ठेवलं होतं.

निधी तिवारी बांधत होती आलिशान घर

तिच्या आईने दावा केला आहे की निधी तिवारी ही त्यांची सर्वात मोठी मुलगी होती तिने कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. ती आपल्या कुटुंबासाठी बैधन इथं एक आलिशान घर बांधत होती. तिला तिच्या कुटुंबीयांचे आयुष्य सुरक्षित करायचं होतं.

निधीचे वडील अशोक तिवारी हे एखा कंपनीत काम करत होते. मात्र बदलीनंतर नंतर ते कुटुंबापासून वेगळे राहू लागले. निधीने स्थानिक सौंदर्य स्पर्धेत देखील भाग घेतला होती. ती तिने २०२४ चे मिस प्रिटी इंडिया टायटल देखील जिंकले होते. तिचे चित्रपट सृष्टीत जाण्याचे ध्येय होते. जी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे रील्स देखील शेअर करत होती.

Nidhi Tiwari
Tiger death mystery - वाघाच्या मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

पोलिसांचा तपास सुरू

निधीच्या आईने केलेला दाव्याची अजून तरी पुष्टी झालेली नाही. निधीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून तिने एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली होती.

पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला आहे. पोलीस या प्रकरणाचे वेगवेगळे अँगल तपासत आहेत. तिचा मृत्यू झाला त्यावेळी आजूबाजूची परिस्थीत कशी होती. तिचे फोनवरून भांडण झाल्याची देखील माहिती मिळत आहे. आता कुटुंबीयांनी आरोप केलेल्या त्या तरूणाची यात काय भूमिका आहे याचा देखील तपास केला जात आहे.

Nidhi Tiwari
Kankavli Builder Death Mystery | शिकारीचाच छंद बेतला जीवावर !

काय म्हणाले एसपी?

एसपी शियाझ केएम यांनी सांगितलं की, 'निधीच्या कुटुंबीयांनी ज्या तरूणाचे नाव घेतले आहे तो दुसऱ्या राज्यात राहतो. त्याच्याशी निधी शेवटची बोलली असा दावा केला जात आहे. या दाव्याचा देखील तपास करण्यात येत आहे.' निधी मानसिक दबावात होती का याचा देखील तपास केला जात आहे. पोलीस अजूनही तिच्या मृत्यूचे कारण काय आहे याचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news