Tiger death mystery - वाघाच्या मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा

वाघाच्या मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा
Tiger
Tiger
Published on
Updated on

पणजी : साकोर्डा धारबांदोडा येथील जंगलात आढळलेल्या वाघाच्या मृत्यूचे -गूढ अद्याप उलगडलेले नाही. वाघ सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे विच्छेदन करणे शक्य नाही. फॉरेन्सिक लॅबमध्ये वाघाच्या अवयवांचे विश्लेषण करून वाघाच्या मृत्यूचे कारण शोधले जाण्याची शक्यता आहे.

Tiger
Goa crime | पूर्ववैमनस्यातून पुतण्यांनीच मानेवर कुन्हाड घालून केली चुलत काकाची हत्या

अर्थात, त्यासाठी गोवा वन विभागाला राष्ट्रीय संवर्धन व्याघ्र प्राधिकरणाच्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. अर्थात त्याबाबतची खरी माहिती प्रसारमाध्यमांना मिळेल की नाही याबाबत संभ्रमच आहे. याआधी केरी सत्तरी परिसरात फासकीत अडकून २००९ मध्ये एका वाघाचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर २०१९- २० च्या दरम्यान गुळेली येथे चार वाघांचा मृत्यू झाला होता. वाघाने पाळीव जनावर मारल्याने वाघ पुन्हा उर्वरित अवशेष खायला येणार या खात्रीने त्या अवशेषांवर विष घालण्यात आले होते. नंतर ते उर्वरित मांस खाल्ल्याने चार वाघांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन बछडेही होते. त्यानंतर शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. राज्यात बळी गेलेला हा सहावा वाघ आहे.

Tiger
Goa | 'रिव्होल्युशनरी गोवन्स' फुटीच्या उंबरठ्यावर?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news