Cicada Variant: 23 देशांमध्ये पसरला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; काय आहे Cicada विषाणू? भारतावर परिणाम होणार का?

Cicada covid variant BA 3.2: ‘Cicada’ नावाचा BA.3.2 हा कोरोना व्हेरिएंट 23 देशांमध्ये पसरला असून चिंता वाढली आहे. यामध्ये स्पाइक प्रोटीनमध्ये मोठे बदल झाल्यामुळे संसर्ग वेगाने होऊ शकतो.
Cicada covid variant BA 3.2
Cicada covid variant BA 3.2Pudhari
Published on
Updated on

Cicada covid variant BA 3.2: कोरोना संपला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली आहे. जगभरात वेगाने पसरत असलेल्या या नव्या प्रकाराला ‘Cicada’ असं नाव दिलं गेलं आहे. वैज्ञानिक भाषेत याला BA.3.2 म्हटलं जातं. हा ओमिक्रॉनचाच एक बदललेला प्रकार (variant) असून त्याने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे.

‘Cicada’ व्हेरिएंट नेमका काय आहे?

हा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनचा वंशज आहे. 2021 मध्ये ओमिक्रॉनने जगभरात मोठा धुमाकूळ घातला होता. आता त्याचाच हा बदललेला प्रकार समोर आला आहे. या व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 70 ते 75 जेनेटिक बदल आढळले आहेत. स्पाइक प्रोटीन म्हणजे असा भाग जो आपल्या शरीराच्या पेशींमध्ये प्रवेश करायला मदत करतो. त्यामुळे हा व्हायरस अधिक वेगाने पसरतो.

हा व्हेरिएंट कुठून आला?

तज्ज्ञांच्या मते, हा व्हेरिएंट सर्वप्रथम नोव्हेंबर 2024 मध्ये आफ्रिकेत आढळला. त्यानंतर 2025 मध्ये तो हळूहळू इतर देशांमध्ये पसरत गेला. फेब्रुवारी 2026 पर्यंत हा व्हेरिएंट तब्बल 23 देशांमध्ये पोहोचला आहे.

अमेरिकेत जास्त प्रभाव

अमेरिकेत या व्हेरिएंटचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. 29 राज्यांमध्ये सीवेज (wastewater) तपासणीत या व्हायरसचे अंश आढळले आहेत.याचा अर्थ हा व्हायरस ‘अंडर द रडार’ पद्धतीने शांतपणे पसरत आहे.

हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे का?

तज्ज्ञांच्या मते, सध्या तरी असा कोणताही पुरावा नाही की हा व्हेरिएंट अधिक धोकादायक आहे. मात्र, त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. म्हणजेच जास्त लोकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

विशेषतः खालील लोकांसाठी धोका अधिक असू शकतो:

  • फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण

  • Long COVID असलेले लोक

  • वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक

भारतात परिस्थिती काय?

भारतामध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात आहे. INSACOG च्या माहितीनुसार, XFG नावाच्या आणखी एका व्हेरिएंटचे 163 रुग्ण आढळले आहेत. हा देखील ओमिक्रॉनचाच एक प्रकार आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे BA.3.2 भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Cicada covid variant BA 3.2
New Labour Code: 1 एप्रिलपासून नवे लेबर कोड लागू होणार; कामाचे तास, ओव्हरटाईम आणि पगाराच्या नियमांमध्ये मोठे बदल

लस (Vaccine) प्रभावी आहे का?

सध्या उपलब्ध लसी जुन्या व्हेरिएंट्स लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत.
म्हणून हा नवीन व्हेरिएंट शरीराला थोडा ‘अनोळखी’ वाटू शकतो. लस अजूनही गंभीर आजार आणि मृत्यू टाळण्यासाठी प्रभावी आहे. पण संसर्ग पूर्णपणे रोखण्यात ती कमी पडू शकते

‘Cicada’ नाव का पडलं?

‘Cicada’ हा एक कीटक आहे जो अनेक वर्षं जमिनीखाली राहतो आणि अचानक बाहेर येतो.
हा व्हेरिएंटही बराच काळ लक्षात न येता पसरत होता, म्हणून त्याला हे नाव दिलं गेलं आहे.

Cicada covid variant BA 3.2
iPhone Price: भारतामध्ये iPhone 5,000 रुपयांनी महागणार; जुन्या मॉडेल्सच्या किंमतीही वाढणार, ग्राहकांना बसणार फटका

बचाव कसा कराल?

डॉक्टरांच्या मते काही गोष्टी लक्षात ठेवा:

  • नियमित हात धुणे

  • आजारी असल्यास घरी राहणे

  • गर्दी टाळणे

  • गरज असल्यास मास्क वापरणे

  • डॉक्टरांचा सल्ला घेणे

कोरोना संपलेला नाही, तो फक्त बदलत आहे. ‘Cicada’ सारखे नवीन व्हेरिएंट्स आपल्याला सतर्क राहण्याची आठवण करून देतात. घाबरण्याची गरज नाही, पण दुर्लक्षही करू नका. योग्य माहिती आणि खबरदारी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news