COVID new variant | अमेरिकेत कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट

COVID new variant  |
COVID new variant | अमेरिकेत कोरोनाचा नवा घातक व्हेरिएंट
Published on
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटचा संसर्ग फोफावण्यास सुरुवात झाली असून, संशोधकांनी त्याला ‘Cicada' (BA.3.2) असं नाव दिलं आहे. Centres for Disease Control and Prevention (CDC) च्या नव्या अहवालानुसार हा व्हेरिएंट अमेरिकेतील 25 राज्यांमध्ये फोफावला असून, त्याचे 70 ते 75 म्युटेशन असून, आतापर्यंतचा हा सर्वाधिक म्युटेशन असणारा कोरोनाचा व्हेरिएंट ठरत आहे. या विषाणूच्या संसर्गाची रचना पाहूनच त्याला संशोधकांनी ‘सिकाडा’ हे एका किटकाचे नाव दिलं आहे. सध्या फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण सापडले असून, हा नेमका किती धोकादायक आहे, हाच प्रश्न आता नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे.

‘सिकाडा’ असं कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं नाव आहे. प्रत्यक्षात हे नाव एका किटकाचे असून, असे किटक दीर्घकाळासाठी जमिनीखाली राहूनही एकाएकी लाखोंच्या संख्येनं बाहेर येतात. याच कारणामुळं संशोधकांनी या व्हेरिएंटला ‘सिकाडा’ हे नाव दिले. सिकाडा या किटकाला पारदर्शक पंख असून, अमेरिका आणि आशियामध्ये त्यांचं अस्तित्वं पाहायला मिळतं. दरवर्षी उन्हाळ्यात हे किटक आढळतात. 13 ते 17 वर्षे हे किटक जमिनीखाली सुप्त असतात. जमिनीखाली असताना वृक्षांच्या मुळातील द्रव्यांमधून त्यांना पोषण मिळतं.

कैक वर्षांनंतर जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा त्यांची संख्या 100 पटींनी वाढलेली असते. हे किटक जेव्हा बाहेर येतात तेव्हा अतिशय कर्णकर्कश आवाज होतो. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये असेच काहीसे गुण पाहता त्यालाही ‘सिकाडा’ हे नाव देण्यात आलं आहे. 2022 पासून हा व्हेरिएंट नगण्य होता. संशोधकांच्या मते तो डॉर्मेंट अर्थात सुप्त अवस्थेत होता. आता मात्र अधिक घातक स्वरूपात तो समोर आला आहे. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र, अनेक महिने काहीही मागोवा नसताना एकाएकी आता अमेरिका आणि युरोपात त्याचा संसर्ग बळावताना दिसत आहे.

संशोधकांना या व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये 30 हून अधिक म्युटेशन आढळले असून, शास्त्रीय भाषेत त्यास एंटिजेनिक ड्रिफ्ट असे म्हटले जात आहे. हा विषाणू शरीरात इतके बदल करतो की, शरीराची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा त्याला हेरू शकत नाही. कोरोनाचा सिकाडा व्हेरिएंट मानवाच्या मेमरी सेल्सवर आघात करून त्या कमकुवत करतो. ज्यामुळं कोरोनाची लस घेतलेल्यांच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडी या विषाणूतील जुना गुण हेरतात. मात्र, सिकाडाचा आकार बदलत असल्यामुळे अँटिबॉडींना ते मात्र हेरता येत नाही. संशोधन आणि निरीक्षणानुसार नव्या व्हेरिएंटच्या बाबतीत जुनी लस फारशी प्रभावी नाही. अमेरिकेमध्ये हा धोका पाहता एक नवी लस दिली जात असून, ती मात्र प्रभावी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news