Nepal teacher dance viral video: अशी शिक्षिका हवी! हिंदी गाण्यावर नेपाळमधील शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबत जबरदस्त डान्स

Nepal teacher dance viral video: नेपाळमधील एका शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हिंदी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Nepal teacher dance viral video
Nepal teacher dance viral videoFile Photo
Published on: 
Updated on: 

Nepal teacher dance viral video: नेपाळमधील एका शिक्षिकेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हिंदी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा उत्साह, डान्समधील तालबद्ध हालचाली आणि मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नेटकरीही भारावले आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडीओवर गाण्याचे गीतकार सिद्धांत कौशल यांनीही प्रतिक्रिया देत शिक्षिकेचे कौतुक केले आहे.

नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील एव्हरेस्ट अकॅडमी, पदमपोखरी येथे शिकवणाऱ्या सीमा या शिक्षिकेला विद्यार्थ्यांसोबत डान्स करण्याची आवड आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर विद्यार्थ्यांसोबत हिंदी गाणे 'दिलरुबा दिलनशीं'वर डान्स करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Nepal teacher dance viral video
Viral Video: महिलेने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् भरधाव एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये सीमा विद्यार्थ्यांना डान्सच्या स्टेप्स शिकवताना दिसतात. हिरव्या आणि निळ्या रंगाच्या शालेय गणवेशात, गळ्यात ओळखपत्र घातलेली मुले शिक्षिकेच्या प्रत्येक स्टेपची उत्साहाने नक्कल करत आहेत. शाळेच्या नेहमीच्या दिवसात हा डान्स विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण ठरला. सीमा इन्स्टाग्रामवर विद्यार्थ्यांसोबतचे डान्स व्हिडीओ नियमित शेअर करतात. मात्र, या व्हिडीओला नेहमीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला असून तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्साहाने नेटकरीही भारावले

या व्हिडीओमध्ये केवळ शिक्षिकेच्या डान्स स्टेप्सच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि उत्साहही नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कॅमेऱ्यासमोर कोणताही संकोच न करता मुले गाण्याच्या तालावर डान्स करताना दिसतात. प्रत्येक स्टेप आणि ताल अगदी सहजपणे पकडत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या शाळेतील दिवसांची आठवण झाली. काहींनी आपल्या शाळेतही अशी आनंदी आणि विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण नाते जपणारी शिक्षिका असायला हवी होती, अशी भावना व्यक्त केली.

गाण्याच्या गीतकारानेही केले कौतुक

हा व्हिडीओ व्हायरल होत असताना 'दिलरुबा दिलनशीं' या गाण्याचे गीतकार सिद्धांत कौशल यांच्याही नजरेस पडला. रितो रिबा यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल सिद्धांत कौशल यांनी लिहिले आहेत. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सीमा शिक्षिकेचे आभार मानले. त्यांच्या गाण्याला इतके प्रेम दिल्याबद्दल त्यांनी शिक्षिकेचे कौतुक केले. लहान मुले त्यांच्या गाण्याचे बोल ओठांवर गुणगुणताना पाहणे हा दिवसातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले.

Nepal teacher dance viral video
Video Viral: 'बाई वाड्यावर या', गोव्यात रशियन तरुणीसोबत महाराष्ट्रातील पुरुषांचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.