Viral Video: महिलेने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् भरधाव एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली, व्हिडीओ व्हायरल

महिलेने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्यामुळे तिची भरधाव एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली.
Bengaluru SUV Accident: Woman Crashes Into Kebab Centre
Bengaluru SUV Accident: Woman Crashes Into Kebab CentreFile Photo
Published on: 
Updated on: 

Bangalore SUV Accident

बंगळूर : चक्कर आल्याने गोंधळलेल्या महिलेने ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबल्यामुळे तिची भरधाव एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली. या अपघातात गरम तेल अंगावर पडल्याने तीन जण किरकोळ भाजले असून, दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचेही नुकसान झाले. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी बंगळूरमधील बनेरघट्टा परिसरात घडली.

बनेरघट्टा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट ही एसयूव्ही सजीना बेगम चालवत होत्या. त्या केरळममधील व्यावसायिक सफरुल्ला अब्दुल अझीझ यांच्या पत्नी असून, इलेक्ट्रॉनिक्स सिटी फेज-१ परिसरात राहतात.

Bengaluru SUV Accident: Woman Crashes Into Kebab Centre
Mumbai BMW viral video: गाडी थांबव... ट्रॅफिक पोलीस ओरडत होता, तरीही थांबवली नाही; मुंबईत BMW चालवणाऱ्या महिलेचा VIDEO व्हायरल

सी. के. पाल्या रोडवरील ‘हळेवूर कबाब सेंटर’जवळ गाडी आली असताना आपल्याला चक्कर आल्याचे सजीना बेगम यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यावेळी गोंधळलेल्या अवस्थेत ब्रेकऐवजी अॅक्सिलरेटर दाबला गेला. त्यामुळे गाडीचा वेग अचानक वाढला आणि एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली. यावेळी दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. तसेच गरम तेलाने भरलेले भांडेही उलटले.

भांड्यातील गरम तेल दुकानातील कर्मचारी बसवराज आणि कबाब खाण्यासाठी आलेले ग्राहक मुनिकृष्णा व मंजेश यांच्या अंगावर पडले. त्यामुळे तिघांना किरकोळ भाजले. याशिवाय दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींचेही नुकसान झाले. जखमींवर दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातात दुचाकीचे नुकसान झाल्याने परमेश ए. यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अपघातानंतर संबंधित महिलेने दुचाकीच्या दुरुस्तीचा खर्च देण्याचे, तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याने तक्रार दाखल केल्याचे परमेश यांनी सांगितले.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सजीना बेगम आणि सफरुल्ला अब्दुल अझीझ हे या कबाब सेंटरमधून नियमितपणे कबाब खरेदी करत होते. घटनेच्या दिवशीही ते कबाब घेण्यासाठीच आले होते. मात्र, त्यावेळी हा अपघात घडला. जखमींच्या उपचारांसाठी आपण सुमारे ७५ हजार रुपये खर्च केल्याचा दावा अझीझ यांनी केला आहे. सजीना बेगम पोलिसांसमोर हजर राहून जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Bengaluru SUV Accident: Woman Crashes Into Kebab Centre
IAS Officer Wife Viral Video: IAS अधिकाऱ्याची पत्नी असणे किती कठीण असते? एका महिलेने सांगितलं वास्तव; पाहा व्हिडिओ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.