Nepal floods 2026: नेपाळमधील महापुराचे पाणी भारतातही पोहोचले; उत्तर प्रदेशातील गंडक नदीत आढळले ३ मृतदेह

नेपाळमधून वाहत आलेले तीन मृतदेह गुरुवारी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात गंडक नदीत आढळून आले.
Nepal floods 2026
Nepal floods 2026File Photo
Published on
Updated on

Nepal floods 2026

नवी दिल्ली: हिमालय पर्वतामध्ये बुधवारी झालेले भूस्खलन आणि नेपाळ-तिबेट सीमेवरील रसुवागढी येथे धडकलेला विनाशकारी पूरप्रवाह यांच्यात अवघ्या सात मिनिटांचे अंतर होते. मात्र, पुराचा हा मार्ग प्रवाहाच्या दिशेने सुमारे २०० किमीपर्यंत पसरला आहे. नेपाळमधून वाहत आलेले तीन मृतदेह गुरुवारी उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात गंडक नदीत आढळून आले. भारत-नेपाळ सीमेलगत असलेल्या चितवन जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १३२ मृतदेह सापडले आहेत.

अवघ्या ७ मिनिटांचा महाप्रलय

भूस्खलनाचा पहिला भूकंपीय संकेत सकाळी ८:३७ वाजता नोंदवला गेला. सीमा सुरक्षा दलाच्या फुटेजमध्ये दिसले की, अरुंद दरीतून प्रचंड वेगाने येणारा पाण्याचा लोट पाहून लोक जीव वाचवण्यासाठी पळत सुटले होते. या सात मिनिटांच्या अंतरावरून आपत्तीचा वेग किती प्रचंड होता हे दिसून येते, परंतु लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हा वेळ पुरेसा नव्हता. नेपाळच्या पूर व्यवस्थापन प्राधिकरणाला हे पाणी भोटे कोशी नदीत शिरल्यानंतरच या आपत्तीची माहिती मिळाली.

Nepal floods 2026
Nepal flash flood cause: भूकंप की हिमनदी कोसळली? नेपाळमधील महाप्रलयाचे नक्की कारण काय? अमेरिकन संस्थेचा मोठा खुलासा

नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाचे जलतज्ज्ञ सौहार्द जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८:४० वाजता पुराचे पाणी नेपाळच्या हद्दीत आले आणि अवघ्या १० मिनिटांत ते स्याब्रुबेसी येथे पोहोचले. "तिबेटमध्ये जेव्हा हा पूर निर्माण होत होता, तेव्हाच जर आम्हाला पूर्वसूचना मिळाली असती, तर जीवितहानी मोठ्या प्रमाणावर टाळता आली असती," असे जोशी यांनी सांगितले.

नेपाळच्या मैदानी भागांत मोठा विध्वंस

नेपाळच्या पूर अंदाज विभागाला सकाळी ९:०५ वाजता या मोठ्या पुराची माहिती मिळाली. त्यानंतर काही मिनिटांतच रसुवा, नुवाकोट, धादिंग आणि चितवन येथील नदीकाठच्या ६ लाख ५० हजारांहून अधिक लोकांना धोक्याचे इशारा देणारे एसएमएस पाठवण्यात आले. त्यानंतर हा पूरप्रवाह त्रिशूली नदीतून नारायणी नदीत गेला आणि आपल्यासोबतचा गाळ व अवशेषांचा साठा नेपाळच्या दक्षिणेकडील मैदानी प्रदेशाकडे घेऊन गेला. या पुराने दक्षिण नेपाळच्या मैदानी भागांत मोठा विध्वंस घडवून आणला.

भारतातही आढळले मृतदेह

नारायणी नदी पुढे जाऊन 'गंडक' नदी म्हणून ओळखली जात असल्याने पुराचा हा मार्ग भारतातही पुढे गेला. सशस्त्र सीमा बल पथकांनी महाराजगंज येथे दोन महिला आणि एका पुरुषाचे मृतदेह बाहेर काढले. एसएसबीचे निरीक्षक अरुण पांडे यांनी सांगितले, "नेपाळमधून गंडक नदीत वाहून आलेले तीन मृतदेह आतापर्यंत भारतीय हद्दीत सापडले आहेत."

Nepal floods 2026
Nepal Floods | नेपाळ जलप्रलयात ४०० बळी; २८८ भारतीयांसह १५०० बेपत्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news