

Neha Bora Gender Identity: जंतर मंतरवरील नीट पेपर फुटीच्या आंदोलनात फेमस झालेल्या नेहा बोराने आपल्या जेंडरबाबत एक मोठा खुलासा केला आहे. सध्या देशभरात ज्या विद्यार्थी नेत्याचं नाव गाजत आहे ते नाव म्हणजे नेहा बोरा... ऑल इंडिया स्टुडंड असोसिएशन अध्यक्ष असलेल्या नेहाने अनेक आंदोलनात आपला बेधडकपणा दाखवून दिला आहे. नेहा राहुल गांधींसोबत खांद्याला खांदा लावून लढत असली तरी आपली वेगळी ओळख असल्याचं ठासून सांगते.
नेहा वोराने आपल्या लैंगिक ओळखीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. नेहाने आपल्याला स्त्री किंवा पुरूष या लिंगभेदात अडकून रहायचं नाही. नेहा स्वतःला नॉन बायनरी मानते. नेहा वोराने माध्यमांना देखील इंग्रजीत She किवा Her लावून संबोधित करतात. मात्र मला एक व्यक्ती म्हणूनच ओळखलं जावं असं नेहाचं मत आहे.
एका मुलाखतीदरम्यान नेहाला माध्यमांकडून चुकीच्या पद्धतीनं संबोधित केलं जातं यााबबत विचारलं असता नेहाने अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. एकाचवेळी बोलताना लोक मला वेगवेगळ्या पद्धतीनं संबोधित करतात असं सांगितलं. कधी She चा वापर करतात तर कधी They वापरतात. मी आता याचा स्विकार केला आहे. लोकांना नॉन बायनरी लोकांना कसं बोलवायचं हे समजायला अजून वेळ लागले. नेहा म्हणते, आता काही माध्यमे मला एक व्यक्ती म्हणून संबोधित करू लागले आहेत.
नॉन बायनरी लोक म्हणजे ट्रान्सजेंडर लोक नाहीत. ते त्यापेक्षा वेगळे असतात. त्यांची लैंगिक ओळख ही महिला किंवा पुरूष या दोन श्रेणीत केली जात नाही. काही नॉन बायनरी लोक महिला आणि पुरूष दोन्ही स्वरूपात स्वतःला पाहतात. काही लोक स्वतःला एक व्यक्ती मानतात. ते आपली ओळख एक महिला किंवा एक पुरूष अशी ठेवू इच्छित नाहीत. नेहा देखील स्वतःला महिला किंवा पुरूष अशा श्रेणीत अडवकू इच्छित नाही.
नेहा उत्तराखंडमधून येते. नेहाने दिल्ली विद्यापीठातून डिग्री घेतली असून त्यानंतर दिल्लीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर विद्यापीठातून एमएचे शिक्षण पूर्ण केलं. सध्या नेहा जेएनयूमध्ये पीएचडी करत आहेत. नेहा आता जेएनयूमध्ये डाव्या चळवळीचा चेहरा आहे.