NEET परीक्षेचा केमिस्ट्रीचा पेपर १००% मॅच! अंतर्गत चौकशीत धक्कादायक खुलासा, NTA ने पेपर सेटर्सची नावे थेट CBI ला सोपवली

नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणून फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेतील केमिस्ट्रीचे सर्व प्रश्न मूळ नीट परीक्षेशी १०० टक्के जुळल्याचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अंतर्गत चौकशीत स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे NEET  पुनर्परीक्षेबाबत आढावा बैठक घेतली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे NEET पुनर्परीक्षेबाबत आढावा बैठक घेतली.PTI
Published on
Updated on

NEET paper leak

नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संभाव्य प्रश्नपत्रिका म्हणून फिरत असलेल्या प्रश्नपत्रिकेतील केमिस्ट्रीचे सर्व प्रश्न मूळ नीट परीक्षेशी १०० टक्के जुळल्याचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या अंतर्गत चौकशीत स्पष्ट झाले आहे. यानंतर NTA ने रसायनशास्त्राचा पेपर तयार करणाऱ्या सर्व प्राध्यापकांची आणि भाषांतर करणाऱ्यांची नावे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी पाठवली आहेत.

३ मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेनंतर चार दिवसांनी, म्हणजेच ७ मे रोजी एनटीएला पेपरफुटीबाबत ईमेलद्वारे माहिती आणि फुटलेल्या पेपरची पीडीएफ फाईल मिळाली होती. जेव्हा एनटीएने या पीडीएफची प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी तुलना केली, तेव्हा त्यांना रसायनशास्त्राचे १०० टक्के प्रश्न लीक झाल्याचे आणि जीवशास्त्राचे प्रश्न अंशतः लीक झाल्याचे आढळून आले. एनटीएने रसायनशास्त्राच्या पेपरशी संबंधित सर्व प्राध्यापक आणि अनुवादकांची संपूर्ण यादी सीबीआयला दिली आहे. "यामध्ये २६-२७ लोकांचा समावेश आहे," असे सूत्राने सांगितले. यापैकी २४ जण अनुवादक आहेत, तर उर्वरित प्रश्नपत्रिका तयार करणारे आहेत. ज्यात फिजिकल, इनऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक केमिस्ट्रीसाठी प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यातील काही जण आधीही अनुवादक आणि पेपर सेटर्स म्हणून कार्यरत असण्याची शक्यता, सूत्राने सांगितली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे NEET  पुनर्परीक्षेबाबत आढावा बैठक घेतली.
NEET Paper Leak: एका email ने CBI, NTA हादरली.... त्या pdf च्या आधारे सुथार यांनी कशी केली नीट पेपरफुटीची भांडाफोड

NEET परीक्षा विविध भारतीय भाषांमध्ये घेतली जाते. त्यामुळे एनटीएकडून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांसाठी अनुवादक नेमले जातात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अर्थाचा विपर्यास होऊ नये म्हणून प्रत्येक भाषेसाठी दोन भाषांतर करणारे ठेवण्याची पद्धत आहे. एक जण मूळ इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे प्रादेशिक भाषेत (उदा. मराठी) भाषांतर करतो, तर दुसरा अनुवादक त्या मराठी प्रश्नपत्रिकेचे पुन्हा इंग्रजीत भाषांतर करतो. भाषांतरादरम्यान मूळ अर्थ बदलू नये, याची खात्री करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. मात्र, ही संपूर्ण व्यवस्था परस्पर विश्वासावर आधारित असल्याने ‘घरचा भेदी लंका ढाए’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आता शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर NTA आता प्रश्नपत्रिका तयार करणारे आणि अनुवादक यांची पार्श्वभूमी स्वतंत्र तृतीय पक्षामार्फत तपासण्याचा विचार करत आहे. २१ जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी NTA ने केवळ केमिस्ट्रीच नव्हे तर फिजिक्स आणि बायोलॉजी विषयांचे सर्व प्रश्नपत्रिका तयार करणारे आणि अनुवादक बदलले आहेत.

दरम्यान, CBI ने नुकतेच पुण्यातील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली. ते केमिस्ट्री प्रश्नपत्रिका तयार करण्याबरोबरच तिचे मराठी भाषांतर करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचे समोर आले आहे.

२०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसीनुसार प्रश्नपत्रिका तयार करताना कडक सुरक्षा प्रोटोकॉल लागू करण्यात आले होते. प्रश्नपत्रिका इंटरनेटविरहित सुरक्षित कक्षात तयार केली जात होती. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना मोबाईल फोन किंवा लॅपटॉप नेण्यास मनाई होती. तरीही पेपरफुटी झाल्याने NTA च्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे NEET  पुनर्परीक्षेबाबत आढावा बैठक घेतली.
NEET Paper leak: नीटचा पेपर फुटलाय हे सर्वात आधी कोणाला कळालं... पोलिसांनी FIR का दाखल केली नाही, ३ मे रोजी नेमकं काय झालं?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news