

NEET Paper Leak wistleblower: NTA नीट पेपर लीक सर्वात आधी कोणी समोर आणली? कोणाच्या एका मेलमुळं संपूर्ण देशात मोठा भूकंप आला आणि २२ लाख विद्यार्थ्यांची झालेली मेडिकल प्रवेश परीक्षा रद्द करावी लागली.... या व्यक्तीचं नाव आहे शिशिकांत सुथार! राजस्थानच्या सीकरमध्ये केमेस्ट्री शिकवणारे शशिकांत सुथार यांनी सर्वात आदी नीट युजी २०२६ चा पेपर फुटल्याचा भांडाफोड केला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ३ मे रोजी सायंकाळी परीक्षा संपल्यानंतर त्यांच्या घर मालकाने त्यांना व्हायरल होत असलेल्या संभाव्य पेपरची कॉपी दाखवली होती. या पीडीएफमध्ये केमेस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व प्रश्न हुबेहूब मॅच होत होते.
शशिकांत सुथारने एएनआय आणि पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, '३ मे सायंकाळी ५ वाजता परीक्षा संपल्यानंतर नीटच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर मी माझ्या घर मालकाला भेटलो. त्यांनी मला व्हायरल होत असलेली पीडीएफ दाखवली. त्यांनी मला या पीडीएफमधील प्रश्न हे परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत आले होते का असे याची तपासणी करण्यास सांगितलं.'
'मी या पीडीएफची केमेस्ट्रीच्या भागातील प्रश्नांशी तुलना केली तर मला जाणवलं यातील सर्व ४५ प्रश्न जसेच्या तसे या पीडीएफमध्ये होते. त्यानंतर मी त्या घरमालकांना अशा प्रकारच्या अजून काही पीडीएफ तुमच्याकडे आहेत का असं विचारले. त्यांनी मला बायोलॉजीची देखील पीडीएफ दाखवली.'
सुथार यांनी पुढे सांगितलं की, 'मी माझ्या एका साथीदार शिक्षकाच्या मदतीने बायोलॉजीची नीट परीक्षेतील प्रश्न आणि गेस पेपर पीडिएफमधील प्रश्न यांची पडताळणी केली असता त्यातील ९० प्रश्न मॅच झाले. त्यानंतर मला हे प्रकरण गंभीर असल्याचं कळालं. त्याच रात्री आम्ही या प्रकरणाची औपचारिक तक्रार दाखल केली. तसेच पुढे NTA आणि सीबीआय, शिक्षण मंत्रालय यांना मेल देखील केले.
७ मे रोजी एनटीएचा ईमेल मिळाला. पुढच्या दिवशी ८ मे रोजी सकाळी एनटीए आणि सीबीआयचे फोन आणि मेसेज यायला सुरूवात झाली. मी या सर्व एजन्सीचे आभार मानतो की त्यांनी अत्यंत वेगानं काम करत प्रत्युत्तर दिलं अन् लगेच कारवाई केली. त्यांनी या पेपरफुटीमध्ये सामील असलेल्या लोकांचा यशस्वीरित्या पर्दाफाश केला आहे.
एका मुलाखतीत शशिकांत यांनी सांगितलं की ते सीकर मधील उद्योग नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी लेखी तक्रार आणि पुरावे मागितले. पुढचे चार दिवस आम्ही व्हायरल पीडीएफ, स्क्रीनशॉट आणि इतर डिजीटल पुरावे गोळा केले.
मुळचे राजस्थानमदील हनुमानगड जिल्ह्यातील नोहरचे रहिवासी असलेल्या सुथार यांनी CBT वर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पुढच्या वर्षी नीट परीक्षा ही कंप्युटर बेस्ट टेस्टिंग (CBT) च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. मात्र ही प्रणाली देखील पूर्णपणे सुरक्षित नाहीये. नीट युजीने प्री आणि मेन्स अशा दोन परीक्षा घेतल्या पाहिजेत. जरी पहिल्या टप्प्यात पेपर फुटला तरी दुसऱ्या टप्प्यात हा फ्रॉड थांबवता येईल.
शशिकांत यांनी केलेल्या दाव्यानुसार १८० प्रश्नापैकी १३५ प्रश्न लीक झाले होते. त्यांनी फिजिक्सच्या पेपरबाबत कोणतीही माहिती किंवा पीडीएफ मिळाली नसल्याचे सांगितलं.