NEET Exam : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण; चौघांना अटक

NEET Exam : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण; चौघांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क :  नीट परिक्षा कथित पेपरफुटी प्रकरणी बिहार पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. माध्यमांशी बोलत असताना बिहार पोलिसांनी सांगितले विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. NEET 2024

पेपरफुटी प्रकरणी चौघांना अटक 

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश चाचणी (NEET) च्या वादाच्या पार्श्वभूमीवर, बिहारमधून चार विद्यार्थ्यांना  अटक करण्यात आले आहे. यापैकी अनुराग यादव, नितीश कुमार, अमित आनंद या तीन विद्यार्थ्यांनी  प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशी लीक झाल्याची कबुली दिली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका मिळाली होती आणि ती लक्षात ठेवायला लावली होती, असेही त्यांनी म्हंटले आहे. पोलिसांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. आदल्या दिवशी मिळालेल्या पेपर मधील प्रश्न दुसऱ्या दिवशी झालेल्या परीक्षेत आले होते. दरम्यान  दानापूर नगरपरिषदेतील कनिष्ठ अभियंता सिकंदर यादवेंदू यानेही पेपर फुटण्यात आपली भूमिका कबूल केली आहे.NEET 2024

परिक्षेला तेच प्रश्न होते…

या प्रकरणातील संशयित आरोपी विद्यार्थी अनुराग यादव हा बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी आहे. त्याने आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, "मी कोटा येथील  कोचिंग सेंटरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होतो. माझे काका सिकंदर प्रसाद यादवंदू हे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मला  फोन केला आणि सांगितले नीट परीक्षा  ५ मे रोजी आहे, आता तू कोटाहून परत ये. परीक्षेची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. त्यानंतर त्यांच्या विनंतीवरून मी कोटाहून परत आलो. ४ मे च्या रात्री  काकांनी मला अमित आनंद आणि नितीश कुमार यांच्यासोबत सोडले. तिथे मला नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देण्यात आली. तिथे रात्री परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची तयारी करण्यात आली. माझे केंद्र डी.वाय.पाटील शाळेत होते.  मी परीक्षेला बसण्यासाठी शाळेत गेलो तेव्हा प्रश्नपत्रिका पूर्णपणे लक्षात होती. परीक्षेत मला तेच प्रश्न पडले.

NEET 2024 : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरण नेमकं काय आहे?

  • ग्रेस गुण मिळालेल्या १५६३  विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोप
  • सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलैरोजी

यासंदर्भात हितेश सिंग कश्यप यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. कर्नाटक, ओडिशा, झारखंड आदी राज्यांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र निवडीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये लाच दिल्याचा गंभीर आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या प्रकरणात परीक्षा केंद्रावर ड्युटी करणाऱ्या ५ शिक्षकांना अटक झाली आहे.  त्यांनी चौकशीत २५ विद्यार्थ्यांबाबत माहिती दिली असल्याचेही याचिकेत नमूद आहे. NEET 2024

दरम्यान, नीट परीक्षेतील फेपरफुटी आणि ग्रेस गुणांच्या गोंधळाविरुध्द देशातील विविध उच्च न्यायालयात ७ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याच्या मागणीसाठी  एनटीएनेही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने संबंधितांना नोटीस जारी केली आहे. त्यावर ८ जुलैरोजी सुनावणी होणार असल्याचे खंडपीठाने सांगितले.

 त्या १५६३ विद्यार्थ्यांना एनटीएने पाठविला ई-मेल

ग्रेस गुण मिळालेल्या १५६३  विद्यार्थ्यांची २३ जून रोजी फेरपरीक्षा घेण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत सर्व विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे संपर्क साधून कळविण्यात आल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news