Priya Saroj: रिंकू सिंगची होणारी पत्नी खासदार प्रिया सरोज यांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल; भाजप नेत्यांविरोधात गुन्हा

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि क्रिकेटपटू रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज यांचे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Priya Saroj
Priya Sarojfile photo
Published on
Updated on

Priya Saroj

जौनपुर: उत्तर प्रदेशातील मछलीशहर लोकसभा मतदारसंघाच्या समाजवादी पक्षाच्या खासदार आणि क्रिकेटपटू रिंकू सिंगची होणारी पत्नी प्रिया सरोज यांचे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे फोटो 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा गैरवापर करून तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खासदार सरोज यांच्या तक्रारीवरून जौनपुर येथील सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात भाजपच्या जिल्हा मीडिया प्रमुखासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खासदार प्रिया सरोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोद सिंह आणि विशाल सिंह यांच्या फेसबुक व इंस्टाग्राम अकाऊंटवरून सरोज यांचे इडीटेट आणि आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले जात होते. या पोस्टच्या माध्यमातून त्यांची राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, संशयीत आरोपींपैकी अमोद सिंह हा भाजपचा जिल्हा मीडिया प्रभारी असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya Saroj
फोटोग्राफर्सना पोज देत होती करिश्मा कपूर, म्हणाली- “जास्त झूम करू नका”

"भाजपचा सुनियोजित कट"

"हा केवळ माझ्यावर झालेला वैयक्तिक हल्ला नाही, तर एका निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधीच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवण्याचा आणि जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा एक सुनियोजित कट आहे," अशा शब्दांत खासदार सरोज यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

घटनेचे गांभीर्य ओळखून जौनपुरच्या सायबर सेलने 'भारतीय न्याय संहिता' (BNS) आणि 'माहिती तंत्रज्ञान कायद्या'च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणे, मानहानी करणे, अश्लील व दिशाभूल करणारी सामग्री शेअर करणे आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित कलमांचा समावेश आहे.

तक्रारीसोबतच सोशल मीडियावरील त्या वादग्रस्त अकाऊंट्सचे स्क्रीनशॉट्स आणि डिजिटल पुरावे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. सायबर सेल आता या लिंक्स आणि अकाऊंट्सची तांत्रिक तपासणी करत असून, हे फोटो नेमके कुठून अपलोड झाले याचा शोध घेत आहे.

Priya Saroj
Raghav Chadha News | राघव चढ्ढा Gen Z च्या नजरेत 'व्हिलन' का बनले?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news