फोटोग्राफर्सना पोज देत होती करिश्मा कपूर, म्हणाली- “जास्त झूम करू नका”

करिश्मा कपूर तिच्या नव्या टीव्ही रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डांसर च्या नव्या सीझनच्या सुरुवातीसाठी आली होती.
karisma kapoor paparazzi zooming request
फोटोग्राफर्सना पोज देत होती करिश्मा कपूर, म्हणाली- “जास्त झूम करू नका” file photo
Published on
Updated on

karisma kapoor paparazzi zooming request indias best dancer internet reacts

पुढारी ऑनलाईन :

नव्या रिअॅलिटी शोच्या सुरुवतीपूर्वी करिश्मा कपूर फोटोग्राफर्ससमोर पोज देत होती. त्याच वेळी तिने अचानक त्यांना सांगितले की, “कोणीही मागून जास्त झूम करू नका.” तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

karisma kapoor paparazzi zooming request
Emraan Hashmi Awarapan 2 look leaked | लांब कुरळे केस, ब्लॅक गॉगल, तगड्या लूकमध्ये इमरान हाशमी, सेटवरून फोटो लीक

इंटरनेटवर पॅपराजी व्हिडिओंचा एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतो. बॉलिवूड स्टार्स अनेकदा इव्हेंट्स, चित्रपट स्क्रिनिंग आणि टीव्ही शो प्रीमियरदरम्यान फोटोगाफर्सना पोज देताना दिसतात. अलीकडेच ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या नव्या टीव्ही रिअॅलिटी शो इंडियाज बेस्ट डांसर च्या नव्या सीझनच्या सुरुवातीसाठी पोहोचली होती, जिथे ती फोटोग्राफर्ससमोर पोज देण्यासाठी उभी राहिली.

करिश्माने पॅप्सना का काय म्हणाली?

तिच्यासोबत जावेद जाफरी, कोरिओग्राफर गीता कपूर आणि टैरेंस लुइस हेही उपस्थित होते. शोचा पहिला एपिसोड शूट होणार होता. मात्र त्याआधी सर्व जज पॅप्सशी भेटले. फोटो आणि व्हिडिओ सेशननंतर जेव्हा ते निघू लागले, तेव्हा करिश्माने शांतपणे सांगितले, “जास्त झूम करू नका.”

करिश्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. इंस्टाग्राम आणि रेडिटवर अनेक युजर्सनी पुन्हा एकदा पॅपराजी संस्कृतीवर प्रश्न उपस्थित केले. एका युजरने पॅप्सच्या शूटिंग पद्धतीवर नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्याने लिहिले की, करिश्माला हे सगळं तरुण पुरुषांसमोर सांगावं लागत आहे. काहींचं मात्र मत आहे की, तिने चेहऱ्यावर जास्त झूम करू नये, एवढंच सांगितलं.

karisma kapoor paparazzi zooming request
Hardik Pandya-Mahieka Sharma | कोण आहे माहिका शर्मा? हार्दिक पंड्यासोबत रंगलीय डेटिंगची चर्चा

हे पहिल्यांदाच घडलेले नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रीांनी चुकीच्या अँगलने शूट केल्याबद्दल पॅप्सना सुनावले आहे. काही काळापूर्वी जाह्नवी कपूर हिने एका पॉडकास्टमध्ये पॅपराजी संस्कृतीवर टीका करताना सांगितले होते की, काही जण शरीराच्या भागांवर चुकीच्या पद्धतीने झूम करून व्हिडिओ शूट करतात, जे अयोग्य आहे. तसेच नोरा फतेही, मृणाल ठाकुर, मोना सिंह आणि माहिका शर्मा यांनीही अशा प्रकारांवर आक्षेप घेतला आहे.

कामाबद्दल बोलायचे झाल्यास, करिश्माचा इंडियाज बेस्ट डांसर हा रिअॅलिटी शो लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. याशिवाय ती शेवटची मर्डर मुबारक या नेटफ्लिक्स चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये फारशी दिसलेली नाही. तिच्या चाहत्यांना तिच्या पुढील प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news