Modi Trump phone call | PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा; युद्धबंदीच्या करारानंतर दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये प्रथमच संवाद

Modi Trump phone call |सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या संभाषणात जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा
Modi Trump phone call
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.File Photo.
Published on
Updated on

Modi Trump phone call

नवी दिल्ली : मध्य पूर्व आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या युद्धबंदीच्या करारानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पहिली दूरध्वनी चर्चा पार पडली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या संभाषणात दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर : PM मोदी

या संवादानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्‍सवर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं की, माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. विविध क्षेत्रांमध्ये आमच्या द्विपक्षीय सहकार्यात साध्य झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. सर्वच क्षेत्रांमध्ये आमची 'सर्वसमावेशक जागतिक सामरिक भागीदारी' अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली आणि 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' खुली व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वावर भर दिला.

युद्ध परिस्थिती आणि दोन्ही देशांमधील व्यापार या प्रमुख विषयांवर चर्चा

भारतातील अमेरिकेचे दूत सर्जियो गोर यांनी सांगितले की, "या संभाषणादरम्यान इराणमधील युद्ध परिस्थिती आणि दोन्ही देशांमधील व्यापार या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली." या संवादादरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे कौतुक करताना म्हटले की, "भारतातील लोकांच्या मनात तुमच्याबद्दल मोठे प्रेमाचे स्थान आहे." दरम्‍यान, २ फेब्रुवारी रोजी व्यापारी करारातील प्रगतीबाबत आणि २४ मार्च रोजी पश्चिम आशियातील स्थितीवर चर्चा केल्यानंतर, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात आता तिसऱ्यांदा दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा झाली आहे.

Modi Trump phone call
Us Iran Deal: औटघटिकेचा युद्धविराम!

दोन्ही नेते नियमित संपर्कात

सर्जियो गोर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, "काही वेळापूर्वीच या दोन्ही नेत्यांचे संभाषण पूर्ण झाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पंतप्रधान मोदींना नियमितपणे घडामोडींची माहिती देत असतात. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या प्रकल्पांबाबत (Big ticket items) या वेळी प्रामुख्याने चर्चा झाली."

Modi Trump phone call
India Oil Crisis: हार्मुझमधून भारतासाठी आनंदवार्ता! आता तेल अन् गॅसचा प्रश्न मिटणार, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची मोठी घोषणा

पाकिस्तानमधील शांतता चर्चा निष्फळ

गेल्या आठवड्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे झालेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सध्या कोंडीत अडकले आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम असून २२ एप्रिलपर्यंत घोषित करण्यात आलेली तात्पुरती युद्धबंदी सध्या लागू आहे.

Modi Trump phone call
PM Modi |पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन; सागरी मार्गांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्‍याचा पुनरुच्‍चार

शांततेसाठी भारताचा पुढाकार

अमेरिकेचा इराणबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर झालेल्या पहिल्या फोन कॉलमध्ये, पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला होता. विशेषतः जागतिक व्यापारासाठी महत्त्वाची असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) सुरक्षित आणि खुली ठेवण्याबाबत त्यांनी चर्चा केली होती. या संवादाबाबत सोशल मीडियावर माहिती देताना पंतप्रधान म्हणाले होते की, "पश्चिम आशियातील परिस्थितीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी उपयुक्त चर्चा झाली. तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्यास भारताचा पाठिंबा आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित राहणे संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे."

Modi Trump phone call
Donald Trump |"...तोपर्यंत आमचे सैन्य माघारी फिरणार नाही" : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेची इराणवर नाकेबंदी

इराण आणि अमेरिका यांच्यात तब्बल ४७ वर्षांनंतर गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष चर्चा झाली, मात्र त्यातून कोणताही सकारात्मक तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणची बंदरे आणि किनारी भागांची नाकेबंदी करण्याची घोषणा केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातातील बंदरांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.दरम्यान, अमेरिका आणि इराणमधील चर्चेची पुढची फेरी या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news