PM Modi |पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन; सागरी मार्गांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्‍याचा पुनरुच्‍चार

PM Modi Iran call |आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांचाही केला तीव्र निषेध
PM Modi Iran call
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला.File photo.
Published on
Updated on

PM Modi Iran call

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर (Infrastructure) होत असलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा प्रकारचे हल्ले प्रादेशिक स्थिरतेसाठी घातक असून त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवर (Global Supply Chain) विपरीत परिणाम होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच, सागरी मार्गांचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि शिपिंग लेन्स खुल्या व सुरक्षित ठेवण्याच्या महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्‍हणाले म्हटले?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्याशी चर्चा करून त्यांना ईद आणि नौरोजच्या शुभेच्छा दिल्या. हा सणासुदीचा काळ पश्चिम आशियामध्ये शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल, अशी आशा दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. क्षेत्रामधील महत्त्वाच्या वास्तूंवर होणारे हल्ले थांबवणे गरजेचे आहे, कारण यामुळे केवळ प्रादेशिक अशांतता निर्माण होत नाही, तर जागतिक व्यापारातही अडथळे येतात, असे मोदींनी स्पष्ट केले.याव्यतिरिक्त, इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारने दिलेल्या सततच्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

PM Modi Iran call
Israel Iran Conflict PM Modi: इस्त्रायलच्या दौऱ्यावर असताना मोदींना इराण हल्ल्याची कल्पना होती... राजदूतांनी काय सांगितलं?

२८ फेब्रुवारीनंतर दुसर्‍यांदा चर्चा

२८ फेब्रुवारी रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्राध्यक्षांमधील ही दुसरी दूरध्वनी चर्चा होती. यापूर्वी १२ मार्च रोजी राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी पंतप्रधानांना इराणमधील सद्यस्थिती आणि प्रादेशिक घडामोडींबाबत माहिती दिली होती.

PM Modi Iran call
IRIS Dena Warship Incident | "भारताने आम्हाला खरोखरच मोठी मदत केली" : 'IRIS देना' वरील वादावर इराणी राजदूतांचा पूर्णविराम

बदलत्या सुरक्षा स्थितीबद्दल पंतप्रधान मोदींनी व्‍यक्‍त केली चिंता

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी बदलत्या सुरक्षा स्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व समस्यांचे निराकरण केवळ 'संवाद आणि मुत्सद्देगिरी' यांच्या माध्यमातूनच झाले पाहिजे, या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

PM Modi Iran call
Iran US war | "अमेरिकेशी चर्चा नाही..." : युद्धाबाबत दिवंगत खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केले मोठे विधान

'होर्मुज सामुद्रधुनी'वर इराणचे नियंत्रण

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणनेही शेजारील देश आणि इस्रायलला लक्ष्य केले आहे. इराणचे 'होर्मुजची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या सागरी मार्गावर नियंत्रण आहे, जिथून जगातील सुमारे २० टक्के ऊर्जेचा पुरवठा होतो. या संघर्षानंतर इराणने या मार्गावरून जहाजांच्या वाहतुकीवर मर्यादा आणल्या आहेत. संघर्ष सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), कतर, बहरीन, कुवैत, जॉर्डन, फ्रान्स आणि मलेशिया यांसारख्या विविध देशांच्या नेत्यांशी चर्चा करून शांततेसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news