Sim Card Limit: आता देशात एका नागरिकाला फक्त ९ सिमकार्ड मिळणार; टेलिकॉम कंपन्यांचा मोठा निर्णय

Limit On SIM Cards Per Person India: एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ सिमकार्ड असतील तर त्याला १० वे सिमकार्ड मिळणार नाही.
Limit On SIM Cards Per Person India
Limit On SIM Cards Per Person Indiapudhari
Published on
Updated on

Maximum Sim Cards per Person in India

देशातील टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील एका नागरिकाला त्याच्या नावावर फक्त ९ सिमकार्ड मिळणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ सिमकार्ड असतील तर त्याला १० वे सिमकार्ड मिळणार नाही.

Limit On SIM Cards Per Person India
DoT Telecom Rules: सरकारचा मोठा निर्णय! आता तुमच्या कॉल-मेसेजचा डेटा भारताबाहेर जाणार नाही; DoT चे नवे नियम लागू

सरकारने एका व्यक्तीकडे किती सिम कार्ड असावे याबाबतचे नियम कडक केले असून २४ ऑगस्टपासून टेलिकॉम कंपन्यांना ज्या व्यक्तीकडे ९ सिमकार्ड आहेत त्यांना नवीन सिमकार्ड देणे बंद करण्यास सांगितलं आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली आहे.

Limit On SIM Cards Per Person India
Telecom Employees : संचार निगमच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार प्राप्ती कराचा परतावा

द डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने १७ ऑगस्टच्या तारखेचे एक परिपत्राक जारी केले आहे. त्यात टेलिकॉम कंपन्यांना जे व्यक्ती दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिम कार्ड घेऊण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना शोधण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं आहे. अशा ग्राहकांना त्यांनी कमाल सिमकार्ड धारणाची मर्यादा ओलांडली असल्याचे सांगण्यात येईल.

Limit On SIM Cards Per Person India
SIM card damage in monsoon : पावसाळ्यात सिमकार्ड का होते खराब? जाणून घ्या कारणे अन् उपाय

आधीपासूनच होती मर्यादा

सिमकार्ड मर्यादा ही काही नवी गोष्ट नाहीये. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने प्रती व्यक्ती ९ सिम कार्ड विकण्यावर कॅप टाकला होता. हा दहा वर्षापूर्वीच टाकण्यात आलेला कॅप होता. हे नियम देशातील इतर भागांसाठी ९ सिमकार्डचा होता तर जम्मू काश्मीर आणि आसाम, नॉर्थ ईस्टच्या काही राज्यात ही मार्यादा ६ होती.

आता काय बदललं?

आता सरकार हे लिमिट टेलकॉम कंपन्यांकडूनच पाळलं जावं यासाठी प्रयत्न करत आहे. टेलिकॉम कंपन्यांना आता त्यांच्या ग्राहकांकडे किती सिमकार्ड कनेक्शन आहेत याची पडताळणी करावी लागणार आहे. ज्या ग्राहकांनी ही मर्यादा आधीच पार केली आहे त्यांना नवे सिम कार्ड सहजासहजी मिळू नये याची काळजी घेतली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news