SIM card damage in monsoon : पावसाळ्यात सिमकार्ड का होते खराब? जाणून घ्या कारणे अन् उपाय

Asit Banage

पावसाळ्यातील जास्त आर्द्रता फोनच्या सिम स्लॉटमध्ये ओलावा निर्माण करू शकते.

फोनमध्ये पाणी गेल्यास सिमकार्डच्या मेटल कॉन्टॅक्ट्सवर ऑक्सिडेशन किंवा गंज येण्याची शक्यता असते.

सिमवरील धातूच्या पट्टीवर पांढरा किंवा हिरवट थर जमा झाल्यास फोनला सिम ओळखण्यात अडचण येऊ शकते.

सिम ट्रेमध्ये धूळ आणि कचरा साचल्यास सिमकार्डचा फोनशी विद्युत संपर्क तुटू शकतो.

फोन ओला झाल्यास तो त्वरित बंद करून सिमकार्ड बाहेर काढणे योग्य आहे.

सिमकार्ड मऊ, कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून पूर्णपणे सुकू द्यावे.

सिम किंवा फोन सुकवण्यासाठी हेअर ड्रायरची गरम हवा किंवा आगीचा शेक वापरू नये.

सिमकार्ड साफ करूनही काम करत नसेल, तर मोबाइल ऑपरेटरकडून डुप्लिकेट/रिप्लेसमेंट सिम घेणे हा पर्याय आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...