Maneka Gandhi on stray dogs | 'सुप्रीम कोर्टाने जबाबदारी...' : मोकाट कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधी काय म्‍हणाल्‍या?

उच्‍च न्‍यायालयात जाण्‍यास सांगून सर्वोच्‍च न्‍यायालयाने काहीच केले नाही
Maneka Gandhi on stray dogs | 'सुप्रीम कोर्टाने जबाबदारी...' :  मोकाट कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधी काय म्‍हणाल्‍या?
Published on
Updated on

Maneka Gandhi on stray dogs

नवी दिल्‍ली : मोकाट कुत्र्यांच्‍या प्रश्‍नी सर्वोच्‍च न्‍यायालयाने पीडित किंवा संबंधित पुढील दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगून सर्वोच्च न्यायालयाने एकप्रकारे आपली जबाबदारी झटकली आहे. या प्रश्‍नी सर्वोच्‍च न्‍यायालयाने काहीच केले नाही, अशा शब्‍दांमध्‍ये प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि भाजप नेत्या मनेका गांधी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

एकही 'एबीसी' केंद्र, निवारा केंद्र किंवा रुग्णालय उभारले गेलेले नाही

शाळा आणि रुग्णालयांसारख्या संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याबाबतच्या आपल्या आधीच्या निर्देशात बदल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या निकालाबाबत पीटीआय' (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना मनेका गांधी म्‍हणाल्‍या की, "सर्वोच्च न्यायालयाने काहीही केलेले नाही. त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे आणि आता उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. पूर्वीचे आदेश असूनही अद्याप "एकही 'एबीसी' ( प्राणी जन्म नियंत्रण) केंद्र, निवारा केंद्र किंवा रुग्णालय उभारले गेलेले नाही."

Maneka Gandhi on stray dogs | 'सुप्रीम कोर्टाने जबाबदारी...' :  मोकाट कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधी काय म्‍हणाल्‍या?
STRAY DOG CASE SUPREME COURT VERDICT | SC चा दणका... सार्वजनिक ठिकाणची भटकी कुत्री हटवण्याच्या आदेशात दुरूस्तीस नकार

स्थलांतरित करण्याच्या व्यवहार्यतेवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह

मनेका गांधी यांनी भटक्या कुत्र्यांना कायमचे इतरत्र स्थलांतरित करण्याच्या व्यवहार्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्‍या म्‍हणाल्‍या, "कुणीही कुत्र्यांना हटवलेले नाही कारण ते तसे करू शकत नाहीत. तांत्रिकदृष्ट्या हे शक्यच नाही. देशभरात या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आले आहे. म्हणूनच आता त्यांनी सांगितले आहे की, आम्हाला जे सांगायचे होते ते आम्ही सांगितले आहे, आणि जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी उच्च न्यायालयात जावे," असे भाजप नेत्या मनेका गांधी यांनी पुढे नमूद केले.

Maneka Gandhi on stray dogs | 'सुप्रीम कोर्टाने जबाबदारी...' :  मोकाट कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधी काय म्‍हणाल्‍या?
SC Directions On Stary Dogs: भटक्या कुत्र्यांवर 'नियंत्रण' आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलाय फ्री हँड?

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश ठेवला कायम

विशेषतः दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) परिसरामध्ये कुत्रे चावण्याच्या वाढत्या घटना आणि रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंशी संबंधित स्वतःहून दखल घेतलेल्या (Suo Motu) प्रकरणात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निकाल दिला.न्यायालयाने नोव्हेंबर २०२५ चा आपला आदेश कायम ठेवला आहे, ज्यामध्ये अधिकाऱ्यांना शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांसह सार्वजनिक संस्थांपासून भटक्या कुत्र्यांना दूर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Maneka Gandhi on stray dogs | 'सुप्रीम कोर्टाने जबाबदारी...' :  मोकाट कुत्र्यांबाबतच्या आदेशावर मनेका गांधी काय म्‍हणाल्‍या?
Stray Dog : कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा थरार; ५० हजार कुत्र्यांच्या फौजेमुळे नागरिक दहशतीखाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news