Crime News Video: पत्नीला सासरी पाठवत नाही म्हणून जावयानं सासूच्या हात-पाय तोडले, नंतर सासऱ्याच्या डोक्यात घातली तलवार

आरोपी रक्ताने माखलेली तलवार घेऊन लोकांना घाबरवत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

Man Attacks Father In Law With Sword Video: पाली मध्ये एका युवकाने सासुरवाडीत जाऊन आपल्या सासऱ्यावर तलवार हल्ला केला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये आरोपी रक्ताने माखलेली तलवार घेऊन लोकांना घाबरवत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Crime News
Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे वृद्धेचे घर हडपण्याचा प्रयत्न

कौटुंबिक वादाचे तलवार हल्ल्यात रूपांतर

ही घटना राजस्थानच्या पाली शहरातील एका कॉलनीतील आहे. इथे राहणाऱ्या ५५ वर्षाच्या जगदीश जोशी यांनी जवळपास ८ वर्षापूर्वी त्यांची मुलगी आशाचा विवाह मेडता सिटीमध्ये राहणाऱ्या अजय जोशी याच्याशी करून दिला होता. अजय जोधपूरमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करतो. लग्नानंतर काही वर्षांनी पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागला. गेल्या चार महिन्यांपासून दोघांमध्ये टोकाचे वाद झाले होते. त्यानंतर आशा आपल्या तीन मुलांसह माहेरी येऊन राहू लागली होती.

Crime News
Crime News: धक्कादायक! दोघे दारू प्यायला बसले अन् भांडण झालं; नशेत पत्नीने पतीवर घातले कुऱ्हाडीचे २६ घाव

पत्नीला सासरी पाठवून देण्यासाठी दबाव

अजय आपल्या सासुरवाडीवर सतत आपल्या पत्नीला परत पाठवण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र सासू आणि सासरे यासाठी तयार नव्हते. त्यामुळे राग आलेल्या अजयने थेट सासुरवाडीत जाऊन सासऱ्याच्या डोक्यात तलवार घातली.

ही घटना दिवसा ढवळ्या झाली आहे. आशा आणि तिची आई दुर्गा या गल्लीत थांबल्या होत्या. तेवढ्यात अजय बाईकवरून आला. त्याने हेलमेट घातले होते. त्याने तलवार आपल्या जॅकेटमध्ये लपवली होती. त्याने आपल्या पत्नीला पाहिल्या पाहिल्या त्यानं तलवार काढली अन तो तिच्या मागे धावला. जीव वाचवण्यासाठी आशा घरात पळाली.

Crime News
Belgaum Crime : खूनप्रकरणी खानापुरातील बापलेकाला जन्मठेप

सासऱ्याच्या डोक्यात घातली तलवार

याचवेळी सासुबाई दुर्गा जोशी यांनी अजयला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांच्या हात आणि पायावर तलवारीचे वार केले. हे पाहून आशा आपल्या आईला वाचवण्यासाठी बाहेर धावली. मात्र अजयनं तिच्यावरही हल्ला केला. तेवढ्यात जगदीश जोशी आपल्या पत्नी आणि मुलीला वाचवण्यासाठी पळत आले. मात्र अजयनं सासऱ्यांच्या डोक्यात तलवारीचा वार केला. जगदीश जागेवरच खाली कोसळले.

जोशी कुटुंबियांची सून काजल देखील घरातच होती. आवाज ऐकून ती बाहेर आली. त्यावेळी तिने अजय त्याच्या सासू, सासरे आणि पत्नीवर तलवारीनं हल्ला करत होता. ती त्यांना वाचवण्यासाठी गेली असता त्यानं काजलला धक्का देऊन खाली पाडलं.

Crime News
Nagpur crime news: पत्नीने जीवन संपवले... नागपुरात माय-लेकाने उचलले टोकाचं पाऊल; मुलाचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज सुरू

गल्लीत रक्तानं माखलेली तलवार घेऊन दहशत

हल्ला केल्यानंतर रक्तानं माखलेली तलवार घेऊन अजय गल्लीत फिरत होता. त्याला जो कोणी थांबवण्याचा प्रयत्न करत होता त्यांना तो घाबरवून पळवून लावत होता. रक्तानं माखलेली तलवार पाहून गल्लीतील लोकं देखील घाबरली होती. काही वेळानं आरोपी अजय तिथून फरार झाला.

यानंतर स्थानिकांनी जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल केलं. सासरे जगदीश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांची स्थिती नाजूक आहे ते व्हेंटिलेटरवर आहेत. तर दुर्गा जोशी यांच्या हात आणि पायावर तलवारीचे खोल घाव आहेत. त्यांना उपचारासाठी जोधपूरमध्ये पाठवण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news