

Malegaon bomb blast verdict 2025
मुंबई ः मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज, गुरूवारी विशेष एनआयए न्यायालयाने जाहीर केला. यात या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
निकालात काय म्हटले आहे?
पुरोहित यांनी आरडीएक्स आणि बॉम्ब आणल्याचा कोणताही पुरावा नाही.
साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या दुचाकीवर बॉम्बस्फोट झाला नाही, हे सिद्ध झाले.
आरोपींविरोधात युएपीए लावणे योग्य नव्हते.
आरोपींमध्ये एकत्रित कोणतीच बैठक झाली नाही.
बॉम्बस्फोट सिद्ध झाल्याचे सिद्ध करण्यात अपयशी.
संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही.
95 लोक जखमी झाले असे कोर्टाच्या निदर्शनास आले
प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात काहीही पुरावे नाहीत. त्यांच्या घरी काही सापडले याचे पुरावे नाही. फिगर प्रिंट्स सुद्धा घेतले नाही.
प्रज्ञा ठाकूर यांची गाडी होती पण चेसीस नंबर मॅच झाला नाही. त्यांनी ती गाडी विकली होती. ज्यावेळी त्यांनी गाडी विकली त्याच्या आधी त्यांनी सन्यास घेतला होता. त्यामुळे त्या या भौतिक जगापासून दूर होत्या.
मालेगावातील मुस्लीमबहूल भागात एका धार्मिक स्थळाबाहेर 29 सप्टेंबर 2008 रोजी एका दुचाकीमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला ATS कडून आणि नंतर NIA कडून करण्यात आली. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच 'हिंदू दहशतवाद' पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
मेजर रमेश उपाध्याय
अजॉय रहीरकर
सुधाकर द्विवेदी
सुधाकर चतुर्वेदी
समीर कुलकर्णी
सरकारी पक्षाचा दावा
एनआयएच्या वतीने विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरोधात कॉल डेटा रेकॉर्ड, इंटरसेप्ट केलेले फोन कॉल्स आणि आरोपींकडून जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे भक्कम पुरावे सादर केले.
सरकारी पक्षाचा मुख्य युक्तिवाद असा होता की, देवळाली येथील सुधाकर चतुर्वेदीच्या घरात आरडीएक्स (RDX) सापडले होते आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली तिथेच बॉम्ब तयार करण्यात आला होता.
बचाव पक्षाचा प्रतिवाद
बचाव पक्षाने सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले.
साध्वी प्रज्ञा यांचे वकील: स्फोटात वापरलेल्या मोटारसायकलची चेसिस इतकी खराब झाली होती की तिची ओळख पटवणे शक्य नाही, त्यामुळे मालकी सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद केला.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांचे वकील: पुरोहित यांना या प्रकरणात खोट्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्यांना अपहरण करून आणि छळ करून साक्षीदारांना त्यांच्याविरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडले गेले. तसेच, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांसाठी आवश्यक असलेले भारतीय पुरावा कायद्यातील कलम ६५-बी प्रमाणपत्र नसल्याने ते ग्राह्य धरता येणार नाही, असा दावा केला.
इतर आरोपी: इतर आरोपींच्या वकिलांनी पुरावे पेरल्याचा आणि तपासात प्रक्रियात्मक त्रुटी असल्याचा आरोप केला. 'अभिनव भारत' या संघटनेच्या नावाखाली कटासाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेल्या अजय रहिरकर यांनी आपल्याला खोट्या आरोपात अडकवल्याचे म्हटले.
29 सप्टेंबर 2008 रोजी भिक्कू चौकाजवळील मोटरसायकलला बसलेला बॉम्ब फुटला, ज्यानिमित्त सहा लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले
महाराष्ट्र ATS ने सुरुवातीचा तपास करत साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (भाजपच्या माजी खासदार) आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना संशयित म्हणून अटक केली
2011 मध्ये NIA ने प्रकरण हस्तगत करून तपास पुन्हा सुरु केला. 2016 मध्ये ATS च्या काही आरोपांना नाकारून काही आरोपींपासून सुटका केली; मात्र UAPA आणि IPC अंतर्गत गंभीर आरोप कायम ठेवले.
1 लाखांहून अधिक पानांचे पुरावे, 300 साक्षीदारांची साक्ष या सर्वांचा आढावा घेऊन निकाल राखून ठेवला होता. कोर्टाने सातही आरोपींना निकालावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
2008 – स्फोट
2011 – तपास एनआयएकडे
2017 – साध्वी प्रज्ञा यांना जामीन
एप्रिल 2025 – अंतिम युक्तिवाद
31 जुलै 2025 – निकाल
2018 मध्ये 7 आरोपींवर UAPA व IPC अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले. ट्रायलमध्ये 323 साक्षीदारांची चौकशी करण्यात आली, त्यापैकी 34 पासून 40 पर्यंतचे साक्षीदार फितूर झाले.
एप्रिल 2025 मध्ये दोन्ही बाजूंनी अंतिम लिखित युक्तिवाद सादर केला. 1300+ पानांची लेखी युक्तिवाद, पुरावे व कायदेशीर संदर्भांसह युक्तीवाद केला गेला. न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी 19 एप्रिल 2025 रोजी या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल राखला. प्रारंभिकपणे तो 8 मे 2025 रोजी दिला जाणार होता. परंतु प्रकरणातील दस्तऐवजांच्या मोठ्या संख्येमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली.