UP Train Accident | उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, ४ ठार

चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले
Uttar Pradesh Railway Accident
उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेस रुळावरून घसरली File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळ चंदीगड-दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडली. यूपीचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे.

जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना

या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्याचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. संबंधित घटनेचा तपशील अपडेट होत आहे.

भारतीय रेल्वेकडून मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी

भारतीय रेल्वेने सांगितले की, ईशान्य रेल्वेच्या लखनऊ विभागात 15904 दिब्रुगड एक्सप्रेस रुळावरून घसरल्याच्या घटनेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news