LPG cylinder 10kg: मोठी बातमी! आता १० किलोचाच मिळणार एलपीजी सिलिंडर? तेल कंपन्यांचा सरकारकडे प्रस्ताव

सध्या सामान्य लोकांना घरगुती वापरासाठी १४.२ किलोचा सिलिंडर मिळतो. मात्र, गॅसची टंचाई पाहता, अधिक ग्राहकांना गॅस उपलब्ध करून देण्यासाठी सिलिंडरमधील गॅसचे प्रमाण कमी करण्याची शक्यता आहे.
LPG cylinder 10kg
LPG cylinder 10kgfile photo
Published on
Updated on

LPG cylinder 10kg

नवी दिल्ली: देशात सध्या घरगुती गॅसचा पुरवठा मर्यादित असल्याने, उपलब्ध साठ्याचे समान वाटप करण्यासाठी तेल कंपन्या आता १४.२ किलोऐवजी १० किलो गॅसचे सिलिंडर वितरित करण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर सध्या सरकार विचार करत असल्याचे माहिती मिळत आहे.

LPG cylinder 10kg
LPG Price: जर इराण-अमेरिका युद्ध संपलं नाही, तर गॅस सिलिंडरच्या किंमती किती रुपयांनी वाढणार?

काय आहे हा प्रस्ताव?

सध्या सामान्य लोकांना घरगुती वापरासाठी १४.२ किलोचा सिलिंडर मिळतो. मात्र, गॅसची टंचाई पाहता, अधिक ग्राहकांना गॅस उपलब्ध करून देण्यासाठी सिलिंडरमधील गॅसचे प्रमाण कमी करून ते १० किलो करण्याचा प्रस्ताव तेल कंपन्यांनी सरकार समोर ठेवला आहे. एका सरकारी तेल कंपनीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून, "हा प्रस्ताव विचाराधीन असून अंतिम निर्णय सरकारला घ्यावा लागेल," असे स्पष्ट केल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे.

दुसरीकडे, पेट्रोलियम मंत्रालयाने या बातम्यांचे खंडन केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याला अफवा असल्याचे म्हटले आहे. शर्मा म्हणाल्या की, "अशा कोणत्याही प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याची माहिती चुकीची आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सध्या गॅसचा पुरवठा सुरळीत असून बुकिंगचे प्रमाणही ५० लाखांपर्यंत खाली आले आहे."

गॅस पुरवठ्यावर परिणाम होणारी 'ही' आहेत कारणे

'हॉर्मुझची सामुद्रधुनी' भागात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल आणि गॅसच्या आयातीवर परिणाम झाला आहे. सुजाता शर्मा यांच्या मते, देशांतर्गत गॅस उत्पादन वाढले असून, आता ५०-६० टक्के मागणी स्थानिक उत्पादनातून पूर्ण केली जात आहे, जी आधी ४० टक्के होती. गेल्या १० दिवसांत सुमारे २ लाख ग्राहकांनी पाईप गॅस कनेक्शन घेतले आहे, तर ३.५ लाख नवीन कनेक्शन्स जारी करण्यात आली आहेत. सध्या देशात ३३.२ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. आयातीतील अडथळ्यांमुळे सरकारने सध्या व्यावसायिक वापराच्या गॅस पुरवठ्यात कपात करून घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

LPG cylinder 10kg
LPG Cylinder: भारतात एकूण किती LPG सिलिंडर आहेत?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news