LPG Cylinder: भारतात एकूण किती LPG सिलिंडर आहेत?

पुढारी वृत्तसेवा

युद्धामुळे अनेक देशांमध्ये तेल आणि गॅस टंचाई वाढत आहे. मात्र, भारत या संकटापूर्वीच सतर्क झाला असून आवश्यक पावले उचलली जात आहेत.

वास्तविक, १४० कोटी लोकसंख्या असलेला भारत देश तेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून आहे.

हा थेट स्वयंपाकघराशी संबंधित विषय असल्याने, गॅस टंचाईच्या बातमीने लोक चिंतेत आहेत.

परंतु स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि देशात स्वयंपाकाच्या गॅसची कोणतीही टंचाई भासू नये यासाठी आवश्यक आदेश देत आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानुसार, देशात सुमारे ३३ कोटी घरगुती LPG कनेक्शन आहेत.

बहुतांश घरांमध्ये दोन सिलेंडर असतात, या हिशोबाने देशात LPG सिलेंडरची एकूण संख्या सुमारे ६६ कोटींच्या आसपास असू शकते.

यामध्ये 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'अंतर्गत कनेक्शनची संख्या मोठी आहे. याशिवाय, देशात व्यावसायिक सिलेंडरची संख्याही कोटींच्या घरात आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये देशात LPG कनेक्शनची संख्या सुमारे १४.५ कोटी होती. गेल्या १० वर्षांत ही संख्या जवळपास दुप्पट होऊन ३३ कोटींवर पोहोचली आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे १०.४ कोटी गरीब कुटुंबांना मोफत किंवा सबसिडीवर LPG कनेक्शन देण्यात आले आहेत.