Hotel Royal Inn Room 205: स्पर्धा परीक्षा देणारा २३ वर्षाचा तरूण, ३४ वर्षाची एका मुलाच्या आईवर प्रेम... रूम नं २०५ मध्ये शेवट

Hotel Royal Inn Room 205
Hotel Royal Inn Room 205pudhari
Published on
Updated on

Hotel Royal Inn Room 205 case: हॉटेल रॉयल इनमधील रूम नंबर २०५ मध्ये एका प्रेमी जोडप्याचे मृतदेह आढळून आले. २३ वर्षाचा युवराज यादव आणि ३४ वर्षाची भारती अशी मृत झालेल्या जोडप्याची ओळख पटवण्यात आली आहे. युवराज हा उत्तर प्रदेशातील चिरगांवच्या औपरा गावाचा रहिवासी होता तर भारती ही टहरौलीची रहिवासी होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी रूम नंबर २०५ चा दरवाजा तोडला. दोघा विष प्राशन करणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही दुखद घटना घडली. या दोघांनी एकत्रच आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

Hotel Royal Inn Room 205
Shocking Incident | "४ गर्लफ्रेंड्स आणि १२ पानांचे 'ते' पत्र.." : सॉफ्टवेअर इंजिनिअरच्‍या भावी पत्‍नीने जीवन का संपवले ?

रूम नं. २०५ मध्ये काय घडलं?

हॉटेल रॉयल इनच्या स्टाफला ज्यावेळी रूम नंबर २०५ मधून काहीच हालचाल होत नाहीये असं जाणवलं त्यावेळी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस अधिकारी लक्ष्मीकांत गौतम यांच्या नेतृत्वाखाली टीम हॉटेलमध्ये दाखल झाली. त्यावेळी त्यांनी २०५ चा दरवाजा तोडला. आता पाहिलं तर भयावह दृष्य दिसलं.

युवराज आणि भारती बेशुद्ध अवस्थेत पडले होते. पोलिसांनी त्वरित दोघांना झांसीच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. मात्र प्राशन केलेलं विष हे शरीरात पसरलं होतं. त्यामुळं डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

Hotel Royal Inn Room 205
Crime News | धक्‍कादायक! डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या क्रेटमध्ये लपवला!

शेजारील महिलेवर जडला जीव

मृत युवराज यांचे वडील जयपाल आणि काका कमल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज बीए पास झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यांच्या घराजवळच भारती देखील आपल्या पती आणि मुलासोबत रहात होती. भारतीच्या मुलाचा युवराजच्या घरी येणे जाणे होते. त्यामुळं भारतीचा देखील घरातील वावर वाढला होता. याचवेळी युवराज आणि भारती यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. याबाबत कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी युवराज घरातून निघाला आणि दुपारी त्याच्या मृत्यूची बातमीच येऊन थडकली.

Hotel Royal Inn Room 205
Daughter Killed Mother: धक्कादायक! बॉयफ्रेंडवर उडवायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईलाच अल्पवयीन मुलीनं संपवलं

ब्लॅकमेलिंग, कट असल्याचा आरोप

दरम्यान, युवराजच्या कुटुंबीयांनी भारतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ३४ वर्षाच्या भारतीने २३ वर्षाच्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याला ब्रॅकमेल करून त्रास दिला असा आरोप केला. कुटुंबीयांना संशय आहे की या महिलेनेच युवराजला हॉटेलमध्ये बोलवलं आणि आधी विष खायला घातलं. त्यानंतर स्वतः विष प्राशन केलं.

आता पोलीस हॉटेल रेकॉर्ड, कुटुंबीयांची वक्तव्ये यांच्या आधारावर तपास करत आहे जेणेकरून कुटुंबीयांना मृत्यूचे खरे कारण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news