Crime News | धक्‍कादायक! डाएटिशियन पत्नीची हत्या करून मृतदेह सिमेंटच्या क्रेटमध्ये लपवला!

Surat Man Kills Dietitian Wife | अल्‍पवयीन मुलाला सापडलेल्‍या चिठ्ठीमुळे पोलिसांच्‍या तपासाची दिशाच बदलली
Crime News
आरोपी विशाल साळवीने आपल्‍या आहारतज्ज्ञ पत्‍नीची हत्‍या केली. Pudhari
Published on
Updated on

Surat Man Kills Dietitian Wife

गुजरातच्या सुरतमध्ये एका पतीच्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह जुन्या घरामध्ये सिमेंटने भरलेल्या लाकडी पेटीत लपवल्‍याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी विशाल साळवी (वय ४०) याने पत्‍नीचा खून केल्‍यानंतर चार दिवसानंतर स्वतःच पोलिसांत पत्नी बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती.

पतीने स्वतःच पोलिसांत दिली होती पत्नी बेपत्ता झाल्‍याची तक्रार

आरोपी विशाल साळवी याने आपली ३९ वर्षीय पत्नी शिल्पा साळवी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होता. शिल्पा व्यवसायाने आहारतज्ज्ञ (Dietitian) होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याचे विशालने सांगितले. मात्र, तपासादरम्यान विशालच्या अल्पवयीन मुलाला घरात एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली. त्‍याने ती पोलिसांच्या हवाली केली.या चिठ्ठीत विशालने कबुलीवजा मजकूर लिहिला होता की, "माझ्याकडून एक मोठी चूक झाली असून शिल्पा आता जिवंत नाही." या चिठ्ठीमुळे पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली.

Crime News
Crime News |अर्धवट जळालेला मृतदेह, हातावरील टॅटू अन् QR कोड...पतीच्या निर्घृण हत्‍येचे गूढ अखेर उलगडले!

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला

चिठ्ठी मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयावरून सालाबतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका जुन्या बंद घराची झडती घेतली. हे घर विशालच्या मालकीचे होते. घराचे कुलूप तोडले असता पोलिसांना उग्र वास आला. घरातील एका कोपऱ्यात ठेवलेल्या लाकडी पेटीतून हा वास येत होता. ती पेटी उघडली असता त्यात कच्च्या सिमेंटखाली गाडलेला शिल्पा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

Crime News
Crime News: भररस्त्यात पत्नीचा गळा चिरला, मग अंगावर घातली कार; बारामतीच्या लेकीचा कर्नाटकात करुण अंत, थरारक व्हिडिओ समोर!

दाम्‍पत्‍यामध्‍ये होते घरगुती कारणावरुन वाद

प्राथमिक माहितीनुसार, या दाम्पत्यामध्ये गेल्या काही काळापासून घरगुती वाद सुरू होते. विशालला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यातूनच ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. ही हत्या बेपत्ता तक्रार नोंदवण्याच्या ४-५ दिवस आधीच करण्यात आली होती. स्‍थानिक पोलिसांनी सांगितले की, " महिलाबेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला होता, पण त्या चिठ्ठीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक टीम पुरावे गोळा करत आहे."

Crime News
Crime News: मैत्रीला काळिमा! जीवाभावाच्या मित्राने पत्नीसोबत सूत जुळवलं; सहन नाही झालं अन् पतीने दोघांनाही संपवलं

आरोपी अद्याप फरार

गुन्हा उघडकीस आल्यापासून आरोपी विशाल साळवी फरार आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. विविध पोलीस पथके त्याला पकडण्यासाठी रवाना झाली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news