Husband Kills Wife: प्रेम, लग्न आणि निर्घृण हत्या... ९० दिवसांतच मोडला संसार; पत्नीचा खून करून पती पसार

love marriage crime news: 'सात जन्माच्या' शपथा आणि प्रेमविवाहाचे आणाभाके अवघ्या ९० दिवसांतच हवेत विरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Husband Kills Wife
Husband Kills Wifefile photo
Published on
Updated on

Husband Kills Wife

कानपूर: प्रेमविवाहानंतर सात जन्म सोबत राहण्याचे एकमेकांना दिलेलं वचन अवघ्या तीन महिन्यांतच मोडलं. सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका नवविवाहितेची पतीने निर्घृण हत्या करून पलायन केले. कानपूरमधील रतनपूर येथे सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

Husband Kills Wife
Crime News: महाराष्ट्र हादरला! बापाला सरपंच व्हायचं होतं, पण ३ मुलांचा नियम आड आला; तिसऱ्या लेकीला कालव्यात बुडवून मारलं!

सुखी संसाराचे स्वप्न ठरले अधुरे

पनकी परिसरातील रामगंगा एन्क्लेव्हमधील एका फ्लॅटमध्ये शोएब खान उर्फ सौरभ आणि त्याची पत्नी दीपिका सैनी राहत होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून खटके उडू लागले. रोजच्या वादाचे रूपांतर सोमवारी रात्री भीषण हत्यांकांडात झाले. शोएबने दीपिकाची हत्या केली आणि त्यानंतर अत्यंत चलाखीने तो घटनास्थळावरून फरार झाला.

शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता दीपिकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

दुहेरी ओळख आणि हत्येचा बनाव

तपासादरम्यान पोलीस उपायुक्त एस.एम. कासिम आबिदी यांनी आरोपीबाबत धक्कादायक खुलासा केला. आरोपीचे मूळ नाव 'सौरभ' होते, मात्र त्याचे संगोपन मुस्लिम कुटुंबात झाल्यामुळे तो 'शोएब खान' या नावानेही ओळखला जात होता. याच दुहेरी ओळखीसह तो दीपिकाशी संसार करत होता. सोमवारी रात्री त्यांच्यात जोरदार भांडण झाले, ज्यामध्ये शोएबने दीपिकाचा जीव घेतला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून तो फरार झाला.

Husband Kills Wife
crime news | ९ वर्षांचे प्रेमसंबध, दोन महिन्यांचा संसार; पत्नीने आई-वडिलांच्या मदतीने काढला पतीचा काटा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news