Crime News: महाराष्ट्र हादरला! बापाला सरपंच व्हायचं होतं, पण ३ मुलांचा नियम आड आला; तिसऱ्या लेकीला कालव्यात बुडवून मारलं!

sarpanch Election: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा एक धक्कादायक प्रत्यय समोर आला आहे.
Crime News sarpanch Election
Crime News sarpanch Electionfile photo
Published on
Updated on

Crime News sarpanch Election

नांदेड: राजकारणाची आणि सत्तेची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा एक धक्कादायक प्रत्यय समोर आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवता यावी, यासाठी एका बापाने आपल्या ६ वर्षांच्या मुलीला तेलंगणामध्ये नेऊन कालव्यात बुडवून मारले.

निवडणुकीत 'दोन अपत्य' नियमामुळे आपण अपात्र ठरू, या भीतीने क्रूर बापाने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी बाप आणि त्याला मदत करणाऱ्या विद्यमान सरपंचाला बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News sarpanch Election
Crime News: "तू रोज येत जा, ५००० रुपये देईन..." सरपंचाच्या पतीची अल्पवयीन मुलीला अश्लील ऑफर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुळ गावचा रहिवासी आहे. त्याचे गावात सलूनचे दुकान आहे. त्याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले होती. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची त्याला निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास स्थानिक निवडणुका लढवण्यास बंदी आहे.

नियमातून सुटण्यासाठी रचला मुलीच्याच हत्येचा कट

आपल्याकडे तीन मुले असल्याने आपण निवडणूक लढवू शकणार नाही, आपण अपात्र ठरणार म्हणून आरोपी बापाने यातून पळवाट शोधण्यास सुरुवात केली. गावातील विद्यमान सरपंचाने त्याला 'एक मूल कोणाला तरी दत्तक दे' असा सल्ला दिला होता. त्यानंतर आरोपीने मुलाच्या जन्मतारखेच्या दाखल्यात बदल करण्यासाठी पुणे महानगरपालिकेपर्यंत चकरा मारल्या, पण तिथे त्याचे काम झाले नाही. अखेर, एका मुलाचा काटा काढल्यास आपण तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरू, असा क्रूर विचार करून त्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचा कट रचला.

९० किमी दूर नेऊन मुलीला कालव्यात फेकले

२९ जानेवारी रोजी आरोपीने आपल्या मुलीला दुचाकीवर बसवून गावापासून सुमारे ९० किलोमीटर दूर तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात नेले. तिथे एका निर्जन ठिकाणी असलेल्या कालव्यात त्याने मुलीला ढकलून दिले. काही दिवसांनंतर स्थानिकांना कालव्यात मुलीचा मृतदेह आढळला, त्यांनी पोलिसांना कळवले.

घटना उघडकीस कशी आली?

निझामाबादचे पोलीस आयुक्त पी. साई चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली होती. मुलीचा फोटो व्हायरल केल्यानंतर मुखेडच्या काही नागरिकांनी तिची ओळख पटवली. पोलिसांनी केरुळ गावात जाऊन चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बापाला आणि त्याला चुकीचा सल्ला देणाऱ्या सरपंचाला अटक केली आहे.

Crime News sarpanch Election
Crime News: दोन पत्नी असताना तिसरीशी सूत जुळलं, मग पैशांच्या वादातून प्रेयसीला मारलं; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचं भयंकर कृत्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news